follow us at facebooktwitteryoutube
अपडेट: 08.30 pm
  • अहमदनगर जिल्ह्यात वीज कोसळून १ ठार  |  सरकारी धोरणात हस्तक्षेप नाही, हायकोर्टानं दारूनिर्मितीविरोधी याचिका फेटाळली  |  स्मिता ठाकरेंकडून सोनिया गांधींचं कौतुक  |  महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधातील राज्यसभेतलं ते मत शरद जोशींचं  |  पाकिस्तानचा क्रिकेटर मो. युसूफ आणि युनिस खान यांच्यावर आजीवन बंदी  |  ममता बॅनर्जींचं घुमजाव, म्हणाल्या विधेयकावरच्या मतदानाची माहितीच नव्हती  |  १९८४ दंगलप्रकरणी काँग्रेस नेते सज्जनकुमारना जामीन मंजूर  |  महिला आरक्षणाला विरोध केल्यानं साधू यादव काँग्रेसमधून निलंबित  |  सोनिया गांधींकडून सर्वांचे आभार, हा सर्व भारतीय महिलांचा विजय- सोनिया  |  क्रांतिकारी महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत मंजूर, १८६ विरूद्ध १ नं ठराव मंजूर  |  
होम पेज
स्टार माझा
आम्ही कोण?
दिवसभरात
जॉब करायचाय?
कधी काय?
दोन्ही बाजूंनी संवाद
जाहिरात
माझा ब्लॉग
स्टोरीज ऑफ द डे
सहभागी व्हा
व्हिडिओ बघा
लोकप्रिय व्हिडीओ

स्टार सिटी

वेळ १०.००
दहाच्या बातम्या
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला मेल करा
Note प्रायव्हसी पॉलिसी
 
 
 
आम्ही कोण
 
Bullet देशातील दोन सर्वात मोठे मीडिया ब्रँड्स एकत्र आले आणि स्टार न्यूजच्या प्रक्षेपणासाठी त्यांनी ३१ मार्च २००३ रोजी मीडिया कन्टेन्ट अँन्ड कम्युनिकेशन्स सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एमसीसीएस) ची स्थापना केली. एमसीसीएस हे एबीपी प्रा. लिमिटेडची १०० टक्के उपकंपनी असलेली एबीपी टीव्ही आणि स्टार ग्रुपच्या संपूर्ण मालकीची स्टार न्यूज ब्रॉडकास्टिंग लिमिटेड यांचे ७४:२६ असे जॉईन्ट व्हेंचर आहे. भारतातील सर्वात जुन्या आणि अत्यंत प्रतिष्ठित वृ्त्तसमूहांमध्ये आनंद बझार पत्रिका ग्रुपची गणना होते.

Bullet पूर्व भारतामध्ये या समूहाची अनेक यशस्वी प्रकाशने आहेत, आनंद बझार पत्रिका हे बंगाली भाषेतील सर्वाधिक खपाचे दैनिक आणि द टेलिग्राफ हे पूर्व भारतात सर्वाधिक खपणारे इंग्रजी दैनिक याच समूहाच्या मालकीचे आहे. द स्टार ग्रुप हा अशियातील अग्रगण्य मीडिया ग्रुप असून भारतीय मार्केटमध्ये त्यांनी भक्कमपणे आपले पाय रोवले आहेत. अशियामध्ये स्टारच्या पन्नास वाहिन्यांचे ९ भाषांतून प्रक्षेपण होते, ज्यामुळे ५३ देशातील सुमारे ३०० दशलक्ष प्रेक्षकांची मने रिझविली जातात.Studio Picture

Bullet अशियामध्ये स्टारच्या पन्नास वाहिन्यांचे ९ भाषांतून प्रक्षेपण होते, ज्यामुळे ५३ देशातील सुमारे ३०० दशलक्ष प्रेक्षकांची मने रिझविली जातात. भारतामध्ये विविध स्वरुपाच्या ११ चँनेल्सचे प्रक्षेपण स्टार करतो.

Studio Pictureदेशातील पहिली वृत्तवाहिनी स्टार न्यूज, बंगाली भाषेतील पहिली २४ तासांची राष्ट्रीय वृत्तवाहिनी स्टार आनंद, आणि मराठीतील २४ तासांची राष्ट्रीय वृत्त वाहिनी ‘स्टार माझा’ अशा तीन वाहिन्यांचे प्रक्षेपण एमसीसीएस करते. स्टार न्यूज हे हिंदी भाषेतील देशातील आघाडीची वृत्तवाहिनी आहे. नि:ष्पक्षता व समतोलपणाबरोबरच वृत्तसंकलनातील तत्परता आणि बातम्या व वर्तमान घडामोडींची मार्मिक विश्लेषणे ही स्टार न्यूजची खासियत आहे. स्टार न्यूज हे देशातील पहिले आणि एकमेव ग्लोबल इंडियन न्यूज चँनेल आहे आणि सुरुवातीपासूनच तब्बल दोन कोटींहून अधिक कुटुंबांची दर्शकसंख्या त्याला मिळाली आहे.

Bullet जून २००५ मध्ये एमसीसीएसने स्टार आनंदा सुरू केले आणि पहिलेपणाची मूहूर्तमेढ रोबण्याच्या परंपरेत आणखी एकाची भर पडली. प्रक्षेपणाच्या पहिल्या दिवसापासूनच स्टार आनंदाने बंगालमध्ये एक नवा इतिहास रचला. आपल्या वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशक कव्हरेजमुळे स्टार आनंदा ३० लाखांहून अधिक प्रेक्षकांच्या गळ्यातील एव्हाना ताईत बनला आहे. आणि बंगालमधील त्याच गौरवशाली परंपरेची आता स्टार माझा महाराष्ट्रात पुनरावृत्ती करत आहे.
तक्रार निवारण होम पेज  |  आम्ही कोण?  |  दोन्ही बाजूंनी संवाद  |  माझा जॉब करायचाय?  |  जाहिरात