follow us at facebooktwitteryoutube
अपडेट: 10.41 pm
  • पुण्यात स्वाईन फ्लूचे एकाच दिवसात सहा बळी  |  पुणे पीएमपीएलच्या तिकीटात २ रूपयांनी वाढ, किमान भाडं ५ रूपये होणार  |  पुण्यात सेनापती बापट रोडवरील मुथा चेंबर्समध्ये भीषण आग  |  टेस्ट क्रिकेटमध्ये सचिनचं पाचवं द्विशतक  |  सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी नरेंद्र मोदींच्या चौकशीची शक्यता  |  भारतीय संघाला पाचवा झटका, सुरेश रैना १२० रन्सवर आऊट  |  राधानगरी धरण १०० टक्के भरलं  |  जळगाव-३० विद्यार्थ्यांना अज्ञात विषाणूंची लागण  |  पुण्यात दोन दिवसात स्वाईन फ्लूचे ६ बळी  |  मुंबईत ११ हजार जणांना मलेरियाची लागण  |  
होम पेज
स्टार माझा
आम्ही कोण?
दिवसभरात
जॉब करायचाय?
कधी काय?
दोन्ही बाजूंनी संवाद
जाहिरात
माझा ब्लॉग
स्टोरीज ऑफ द डे
सहभागी व्हा
व्हिडिओ बघा
लोकप्रिय व्हिडीओ



वेळ

तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला मेल करा
Note प्रायव्हसी पॉलिसी
 
 
 
माझा ब्लॉग


वास्तव महाराष्ट्राचं
मंदार पुरकर
दो कवडी के मोल बिकने को मराठा तयार नहीं है असं दिल्लीत ठणकावून सांगणारे शाहिर अमरशेख आज किती जणांना ठाऊक आहेत. आज महाराष्ट्र दिन, महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला आज 48 वर्ष पूर्ण होत आहेत. गेल्या पाच दशकात काय मिळवलं काय गमावलं याचा वेध घेण्याचा केलेला हा प्रयत्न आहे.

संयुक्त महाराष्ट्राचा लढा निकराने देत मुंबईसह महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. पण बेळगाव, निपाणी सीमा भागातले बांधव आजही प्रतिक्षेत आहेत की एक दिवस त्यांच्यावर झालेला अन्याय दूर होईल. सीमाभागातल्या बांधवांना महाराष्ट्र विसरला हे कटू सत्य आहे. देशातल्या कानाकोप-यातनं आलेल्या प्रत्येक भारतीयाला सन्मानाची वागणूक देणा-या महाराष्ट्राच्या लेकरांना मात्र कानडी अपमानास्पद वागणूक देत आहेत हे शल्य कायम डाचत राहील. कर्नाटकात होत असणारी मराठी माणसाची गळचेपी आणि मुंबईत घसरत चालेला मराठी टक्का ह्या दोन्हा बाबी संवेदनशील मनाला अस्वस्थ करणा-या आहेत.

ऐंशीच्या दशकातल्या गिरणी संपाने साडे तीन लाख मराठी कामगार आणि त्यांची कुटुंब उधवस्त झाली देशोधडीला लागली. महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी गिरणी कामगारांसाठी काही केलं नाही हेच खरं. आज गिरण्यांच्या जागी मॉल्स उभे राहिले गिरणी कामगार अन्नाला मोताद झाला आणि मालक मालामाल झाले. अनेक राजकारण्यांनी यात आपल्या पुढच्या सात पिढ्यांची बेगमी करुन घेतली.

maharashtra 1.jpg

आज महाराष्ट्रावर एक लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. वीजेच्या तुटवड्याने लागलेलं ग्रहण अजूनही सुटलेलं नाही. ग्रामीण महाराष्ट्र पाण्याच्या दुर्भिक्ष्याने तहानलेला आहे. टँकर मुक्त महाराष्ट्राच्या योजना फक्त कागदावर आहेत. समतोल विकास साधण्यात प्रचंड अपयश आलं आहे हे कबूल करावं लागेल. विदर्भाचा अनुशेष भरुन निघेल का? मराठवाड्याचे सर्व जिल्हे दारिद्र्यरेषेखाली आहेत. हा प्रगत महाराष्ट्र आहे का? आज निधी अभावी कृष्ण खो-यांचं काम रखडलं आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे या जिल्ह्यांची लोकसंख्या दोन कोटींच्या पुढे गेली आहे. नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. पायाभूत सुविधांची अवस्था दयनीय आहे. आज सीएसटी ते कल्याण रेल्वे मार्गाला समांतर रस्ता नाही. आणीबाणीच्या परिस्थीतीत लोकांचे हाल कूत्र देखील खात नाही हे 2005 च्या पावसाळ्यात जोरदार पावसाने थैमान घातलं तेंव्हा दिसून आलं होतं. अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर फक्त मीठी नदीचा गाळ काढणं हे एकच काम हाती घेण्यात आल्याचं दिसून येतयं. समस्यांचा सर्वांगीण विचार करुन सरकार धोरणं का आखत नाही हेच कळत नाही.  मुंबई, ठाण्यातनं उद्योग हद्दपार झालेत त्याबरोबर कष्टकरीही. आता मुबंईचे जे काही शांघाई, दुबई होणार आहे त्यात सर्वसामान्य मराठी माणूस नसेल. चकचकीत मुंबईत मध्यमवर्गीय माणसाला स्थान असणार नाहीये.

महाराष्ट्रात सेझचे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उभे राहत आहेत पण यात शेतकरी भूमीहीन होईल. शेतक-यांचे प्रश्न अनंत आहेत ते सोडवण्याची इच्छाशक्ती राज्यकर्त्यांच्यात दिसून येत नाही. लाखभर शेतकरी आत्महत्या करतात पण सरकारी यंत्रणेला जाग येत नाही.मुळाशी जाऊन प्रश्न सोडवण्याची तळमळ दिसून येत नाही. पॅकेज, योजना केवळ कागदावरच उरतात शेतक-यांच्या पदरी त्यातलं किती पडतं ह्याचा पाठपुरावा का केला जात नाही. महाराष्ट्रात एकेकाळी संस्था, चळवळींनी समृध्द होता. आज जुन्या संस्था मोडकळीस आल्या आहेत, चळवळी थंडावल्या आहेत. महाराष्ट्राला विचारवंतांची परंपरा होती अशी म्हण्णयाची पाळी आहे.एकेकाळी देशाचं वैचारिक नेतृत्व करणारा महाराष्ट्र आज कुठे आहे?  पण हे बदलायला हवं असेल तर शाहिर अमरशेखांचेच शब्दात सांगायचं झाल्यास

जाग मराठा आम जमाना बदलेगा......


प्रतिक्रिया
namaskar, i am working in the gulf and i am born and brought up in mumbai,and of course i speak read write marathi although i am a catholic but with out marathi language i feel incomplet from maharashtra,i paid a hefty price to get this and other marathi channels now i feel at home and i am very proud to be a indian and very happy to be a mumbaikar god bless star majha,i want to sing it **star majhaaaaaaaaaaaaaa**** its me Russell rodrigues
प्रेषक -Mr.Russell rodrigues,दिनांक - 12/24/2009 12:00:00 AM
home bu
प्रेषक -sheetal,दिनांक - 5/17/2009 12:00:00 AM
really its g8 channel in marathi world......i watch dis channel frm inaugration....when star started dis channel i stopped to see all hindi news channel....so u can guess how importent news and presentation gives by STAR MAJHA.
प्रेषक -vishal kaginkar,दिनांक - 5/1/2009 12:00:00 AM
This is the time to act only and not to talk, write, discuss and criticise. You are responsible for your well being or backwardness. Lets be positive and go ahead unitedly. Only this will save Maratghi Identity. We should talk in one voice.
प्रेषक -h.k.ghanvat,दिनांक - 4/23/2009 12:00:00 AM
if you can send this article on your channel, then the responce of the MARATHI opinion would be much better. But dont make business of the issue,this is not a political issue also. think about future of our childs! Dont u want that our MARATHI language must be live in this HINGLISH world.can our childs also have to speak in that Hinglish language? Answer me.... Thanking U.
प्रेषक -Avinash Ganesh Bhoir.,दिनांक - 4/21/2009 12:00:00 AM
Ofcourse i like this channel because of latest information on all the fields like agriculture,political etc. keep it up and best of luck!
प्रेषक -RENUKA A.D. ,दिनांक - 4/19/2009 12:00:00 AM
I like STAR MAJHA because it is purely in MARATHI and all the executies are very clever and knowledgeable like Mr. Purker. I wish all the Best to all of U!!
प्रेषक -DEVAVRAT M.P.,दिनांक - 4/19/2009 12:00:00 AM
I want know that maharashtra government has announced the program make state free quothugndarimuktquot maharashtra But in mumbai we people always see on train track lots shamless people sit and do the sheat but no body catch then They just sit shameless in front all train travelers do something on this
प्रेषक -Sachin,दिनांक - 4/17/2009 12:00:00 AM
i licke this artical
प्रेषक -anil pawar,दिनांक - 4/11/2009 12:00:00 AM
I watched a programme called quotASA KA GHADLAquot. some body called Narendra was talking about Andhashradhha. I felt very sorry for him because of his quotAndhashraddhaquot in so called scientific knowledge, without realising that scientific theories are constantly changing with new proofs on various subjects. 3 days back there was a programme on National geographic wherein they conceded what has been known to hindus for ages that a developing child in the mothers womb starts learning from the 5th month of conception. Our Abhimanyu learnt how to enter a chakra vyuha when he was in mothers womb.
प्रेषक -S SHANKAR,दिनांक - 4/11/2009 12:00:00 AM
Prev Next

तुमची प्रतिक्रिया नाव ई-मेल तुमचा संदेश      
तक्रार निवारण होम पेज  |  आम्ही कोण?  |  दोन्ही बाजूंनी संवाद  |  माझा जॉब करायचाय?  |  जाहिरात