follow us at facebooktwitteryoutube
अपडेट: 10.41 pm
  • पुण्यात स्वाईन फ्लूचे एकाच दिवसात सहा बळी  |  पुणे पीएमपीएलच्या तिकीटात २ रूपयांनी वाढ, किमान भाडं ५ रूपये होणार  |  पुण्यात सेनापती बापट रोडवरील मुथा चेंबर्समध्ये भीषण आग  |  टेस्ट क्रिकेटमध्ये सचिनचं पाचवं द्विशतक  |  सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी नरेंद्र मोदींच्या चौकशीची शक्यता  |  भारतीय संघाला पाचवा झटका, सुरेश रैना १२० रन्सवर आऊट  |  राधानगरी धरण १०० टक्के भरलं  |  जळगाव-३० विद्यार्थ्यांना अज्ञात विषाणूंची लागण  |  पुण्यात दोन दिवसात स्वाईन फ्लूचे ६ बळी  |  मुंबईत ११ हजार जणांना मलेरियाची लागण  |  
होम पेज
स्टार माझा
आम्ही कोण?
दिवसभरात
जॉब करायचाय?
कधी काय?
दोन्ही बाजूंनी संवाद
जाहिरात
माझा ब्लॉग
स्टोरीज ऑफ द डे
सहभागी व्हा
व्हिडिओ बघा
लोकप्रिय व्हिडीओ



वेळ

तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला मेल करा
Note प्रायव्हसी पॉलिसी
 
 
 
माझा ब्लॉग


ब्लॉग माझा ०९ सिझन२ वेल डन ब्लॉगर्स!
प्रसन्न जोशी

ऑसम! ‘ब्लॉग माझा-०९’ स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद, आशय, मांडणी, कल्पकता यांनी समृद्ध ब्लॉग पाहून पहिली प्रतिक्रिया हीच होती....ऑसम! मराठीत...भयंकर सुंदर! मराठी ब्लॉगॉस्फिअर केवळ आहेच असं नाही, तर ते विस्तारतंय, समृद्ध होतंय आणि त्याची व्याप्ती महाराष्ट्रातपुरताच नाही तर, जगभर आहे. हेच या स्पर्धेनं पुन्हा एकदा सिद्ध केलंय.
मुंबई-पुणे, नगर, नागपूर ते बेंगलोर आणि यु.ए.ई ते यु.एस.ए अशा सर्व ठिकाणांहून या स्पर्धेसाठी प्रवेशिका आल्या. यात जसे नवखे ब्लॉगर आहेत, तसे मुरलेलेही. पंचविशी-तिशीचे आहेत, तसेच पासष्ठीचेही. अहो, मधुसुदन काळे यांचा www.sobati-vileparle.blogspot.com हा तर काही आजोबा मंडळींनी एकत्रितरित्या सुरू केलेला ब्लॉगही स्पर्धेसाठी आला. इतकंच काय, पण पोलिस, क्राईम यांना वाहिलेला, व्यंगचित्रांना वाहिलेला असेही ब्लॉग या स्पर्धेसाठी आले. म्हणजेच, मराठी ब्लॉगॉस्फिअर असं विविधतेनं नटलेलं आहे. व्यक्ती ते समष्टी सर्वांना सामावणारं असं हे ब्लॉग नावाचं माध्यम. मराठीच्या जागतिक पातळीवरील प्रसारासाठीही याचा मोठा उपयोग आहे. याचीच दखल घेऊन ‘स्टार माझा’नं ही खास मराठी ब्लॉगर्ससाठी ही स्पर्धा सुरू केली. यंदा या स्पर्धेचं दुसरं वर्ष आहे. मागील वर्षी प्रमाणेच या वेळीही संगणक तज्ज्ञ आणि लेखक अच्युत गोडबोले यांनी ब्लॉग्जच्या परिक्षणाचं अवघड काम आनंदानं स्वीकारलं. त्यांनी निवडलेल्या पहिल्या तीन आणि उत्तेजनार्थ दहा ब्लॉगर्स आणि त्यांच्या ब्लॉग्जना आम्ही प्रसिद्ध करत आहोत. दोन्ही कॅटेगरीजमध्ये क्रम महत्वाचा नाही.

तीन उत्कृष्ट ब्लॉग्जblog news.JPG

अनिकेत समुद्र   http://manatale.wordpress.com

नीरजा पटवर्धन  http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com

दिपक शिंदे     http://bhunga.blogspot.com

उत्तेजनार्थ ब्लॉग्जblog hording.JPG

हरिप्रसाद भालेराव  www.chhota-don.blogspot.com

देवदत्त गाणार     http://maajhianudini.blogspot.com/

मेधा सकपाळ     www.medhasakpal.wordpress.com

सलील चौधरी     www.netbhet.comblog parasuit.JPG

प्रमोद देव        http://purvaanubhava.blogspot.com/

राज कुमार जैन   http://rajkiranjain.blogspot.com

मिनानाथ धसके   http://minanath.blogspot.com

विजयसिंह होलाम  http://policenama.blogspot.comblog coffe.JPG

दिपक कुलकर्णी    http://aschkaahitri.blogspot.com/

आनंद घारे        http://anandghan.blogspot.com

सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन! आणि हो, ज्यांचे ब्लॉग्ज या स्पर्धेत निवडले जाऊ शकले नाहीत, त्यांनी प्लीज प्लीज प्लीज आपले ब्लॉगिंग व्रत सोडू नये. कारण, पुढच्या वर्षी पुन्हा आहेच ‘स्टार माझा’ची स्पर्धा...... ‘ब्लॉग माझा’!!

चांगभलं!

प्रसन्न जोशी


प्रतिक्रिया
प्रसन्न,ह्या स्पर्धेचा निकाला लागून एक महिना होऊन गेला. अजून पारितोषिक वितरण समारंभही झालेला नाहीये. पुढची कारवाई कधी होणार? कळेल काय?
प्रेषक -प्रमोद देव,दिनांक - 12/17/2009 12:00:00 AM
all winners congrats.
प्रेषक -bhimsen supale ,दिनांक - 11/27/2009 12:00:00 AM
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
प्रेषक -buttya.,दिनांक - 11/23/2009 12:00:00 AM
विजेत्यांचे अभिनंदन,धन्यवाद स्टार माझा @ प्रसन्न.
प्रेषक -shrikant sabale,दिनांक - 11/22/2009 12:00:00 AM
एक चांगला उपक्रम... http://mr.upakram.org/node/2175
प्रेषक -शंतनू ,दिनांक - 11/21/2009 12:00:00 AM
vijetyanche blog pahile.chhan aahet.aamhi kuthe kami padlo te kalale.swatahachya creativitila mahatva aahech.pan mi IT cha student nasalyan page have tase design karata aale nahi.pahila prayatn aslyan kadachit .. girte hai vahi .jo hote hai sher ye maidane jang. wo kya girenge.. jo ghutnoke bal chalte hai.
प्रेषक -manoj deokar,दिनांक - 11/21/2009 12:00:00 AM
सर्व विजेत्या स्पर्धकांचं अभिनंदन व ’स्टार माझा’ ला अशी स्पर्धा भरवल्याबद्दल धन्यवाद! पुढच्या वर्षीच्या स्पर्धेत असेच नवीन दर्जेदार ब्लॉग्स पहायला मिळतील, ही अपेक्षा.
प्रेषक -कांचन कराई,दिनांक - 11/21/2009 12:00:00 AM
सर्व विजेत्यांना, खासकरून दोन्ही भुंग्यांना (अनिकेत दादा व दिपक दादा!), हार्दिक हार्दिक शुभेच्छा! विशाल तेलंग्रे http://vishaltelangre.blogspot.com
प्रेषक -विशाल तेलंग्रे,दिनांक - 11/21/2009 12:00:00 AM
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
प्रेषक -vikram,दिनांक - 11/21/2009 12:00:00 AM
प्रसन्न, धन्यवाद :) सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! स्टार माझाने सर्व प्रवेशिकांची यादीही प्रसिद्ध करून त्याचा दुवा इथे द्यावा ही विनंती.
प्रेषक -Deepak Kulkarni ,दिनांक - 11/21/2009 12:00:00 AM
Prev Next

तुमची प्रतिक्रिया नाव ई-मेल तुमचा संदेश      
तक्रार निवारण होम पेज  |  आम्ही कोण?  |  दोन्ही बाजूंनी संवाद  |  माझा जॉब करायचाय?  |  जाहिरात