follow us at facebooktwitteryoutube
अपडेट: 07.00 pm
  • फेसबुकच्या माध्यमातून 12 ऑक्टोबरला पुन्हा मीटर जाम  |  मुंबईत तीनशे ठिकाणी गणेश विसर्जनाची सुविधा, मनपाची माहिती  |  म्हाडा बांधणार अल्प, अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३१ हजार घरं  |  मध्यप्रदेश-देवासजवळ बस नदीत वाहून गेली, ५० जण बुडाल्याची भीती  |  ब्रिटनमध्येच शरण घेण्याची पाक क्रिकेटर मो. आसिफची इच्छा, द टेलिग्राफचं वृत्त  |  राष्ट्रकुलच्या बॅटन रिलेचं आज पुण्यात आगमन  |  गणरायाच्या आगमनाच्या पाश्वभूमीवर पोलिसांचं संपूर्ण साताऱ्यात जिल्हाभर संचलन  |  मंगलोर विमान अपघातात धक्कादायक खुलासा, मुख्य पायलट दीड तास झोपल्याचं उघड  |  
होम पेज
स्टार माझा
आम्ही कोण?
दिवसभरात
जॉब करायचाय?
कधी काय?
दोन्ही बाजूंनी संवाद
जाहिरात
माझा ब्लॉग
स्टोरीज ऑफ द डे
सहभागी व्हा
व्हिडिओ बघा
लोकप्रिय व्हिडीओ

महाराष्ट्र देशा

वेळ ०७.४०
महाराष्ट्र देशा
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला मेल करा
Note प्रायव्हसी पॉलिसी
 
 
 
माझा ब्लॉग


पद्म पुरस्कार आणि पत्रकार
मिलिंद खांडेकर

virsanghvi @PritishNandyNDA/UPA govt awarded padmas to journalists
depending on their political leanings, so why target chatwal now about
22 hours ago@PritishNandy @virsanghvi your campaign makes sense only
if we journalist agree not to accept padma awards, after all its a
favor fm govt000000p.jpg
हे ट्वीटर मेसेज मी प्रीतीश नंदी आणि वीर संघवी यांना पाठवले. हा ब्लॉग
लिहिण्यापूर्वी त्यांच्याकडून काही उत्तर येतंय की नाही याची वाट पाहिली,
तब्बल चोवीस तास.... उत्तर आलंच नाही.
माझं म्हणणं एवढंच होतं की पद्म पुरस्कारांसंदर्भात सध्या जे वातावरण
गढूळ झालंय, ते दूर करण्याची मोहीम चांगली आहे. मात्र आपण पत्रकारांनी
निश्चय0p.jpg करायला हवा की आपण पद्म पुरस्कार घेणार नाही. गेल्या दहा
वर्षांमध्ये NDA आणि UPA ने अनेक लायक पत्रकारांना पद्म पुरस्कार वाटले,
त्यावेळी आपण गप्प होतो. आपल्या बिरादरीने त्याच सरकारकडून पुरस्कार
स्वीकारला, ज्यांच्यावर लक्ष ठेवणं हे आपलं काम होतं. आणि आता आपण
म्हणतोय की, चटवाल पद्मभूषणच्या लायकीचे नाहीत.


चटवाल प्रकरण आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल. संतसिंह चटवाल हे अमेरिकेत
राहणारे भारतीय. अनेक अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरन्ट्स आहेत. मात्र
त्यामुळे प्रसिद्धी होत नाही, तर जे ज्या लोकांसमवेत उठतात, बसतात,
त्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळते. त्यांच्या मित्र आणि स्नेह्यांच्या
यादीत अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यापासून अनेक बड्यांचा
समावेश आहे. क्लिंटन यांचीच पत्नी सध्या अमेरिकेची परराष्ट्र मंत्री आहे.
 म्हणजेच भारत आणि अमेरिका यांच्यातल्या मधुर संबंधांचा पद्मभूषण चटवाल
हे एक भाग आहेत. तर ते बदनाम आहेत, त्यांच्यावर दाखल झालेल्या एका 420
च्या प्रकरमामुळे. सीबीआयने 1992 मध्ये बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदाला00p.jpg
28 कोटी रूपयांचा चुना लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. चटवाल
यांना पद्मभूषण जाहीर झाल्यानंतर सरकारने चटवाल त्या सर्व आरोपातून
निर्दोष मुक्त झाले असल्याचा निर्वाळा दिला होता. चटवाल कशा पद्धतीने
निर्दोष मुक्त झाले, याचा तपशील आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये आलाय.


चटवाल पद्मभूषणसाठी लायक आहेत की नालायक? या वादात मी पडू इच्छीत नाही.
000p.jpgआपणा सर्वांनाच माहितीय की पद्म पुरस्कार कसे मिळतात?  सध्या अनेक
मोठ-मोठे पत्रकार पद्म पुरस्काराभोवती साठलेल्या वातावरणाला स्वच्छ करू
इच्छितात, त्यासाठी त्यांनी एक मोहीम छेडलीय. पण माझी पद्मश्री, तुमच्या
पद्मश्रीपेक्षा जास्त स्वच्छ कशी? हे एक ढोंगच नाही का? मराठीत याला
दुधाला जाऊन भाडं लपवणं म्हणतात.


ठीक आहे, तुम्ही म्हणाल, अजून कुण्या पत्रकारावर 420 चा गुन्हा दाखल
झालेला नाही.  तरीही सगळ्यांनाच हे ठाऊक आहे की कोणते पत्रकार एनडीएच्या
राजवटीत पद्म पुरस्कारासाठी लायक होते आणि कोणते पत्रकार यूपीए राजवटीत
पद्म पुरस्कारासाठी लायक होते.


पद्मश्री मिळालेल्या पत्रकारांच्या यादीवर एक नजर टाका आणि यावेळी
पद्मश्री पुरस्कार मिळालेल्यांच्या यादीवर... वीरेन्द्र सहवागला यावर्षी00000p.jpg
पद्मश्री मिळाली. सचिन तेंडुलकरचे कोच रमाकांत आचरेकर यांनाही याच वेळी
पद्मश्री पुरस्कार देण्यायोग्य समजलं गेलं. याआधी अनेक पत्रकारांनाही
पद्मश्री मिळालीय. सरकारच्या मते सहवाग आणि आचरेकर यांच्याही आधी
पत्रकारांनी या देशाचं भलं केलंय, देशाच्या विकासात योगदान दिलंय. एकवेळ
कामाची तुलना सोडून देऊ, पण यावर तुमचंही एकमत होईल की, पद्मश्रीच्या
निमित्ताने सरकार आपल्याला लाच देतंय आणि आपण आपल्या कर्तृत्वाचा सन्मान
म्हणून त्याचा स्वीकारही करतो.


अजून चोवीस तास झाले तरी मला ट्विटरवरून ना प्रीतीश नंदींचं काही उत्तर
आलंय, ना वीर संघवींचं... तुम्हाला काय वाटतं, काही उत्तर येईल?


प्रतिक्रिया
मिलिंदजी, लोकांना आरसा दाखविलेला आवडत नाही. कारण आरशामध्ये त्यांचे खरेखुरे प्रतिबिंब दिसते. त्या दोघांचेही उत्तर तुम्हाला येणार नाही. ताकाला जाऊन भांडे लपविण्याचा प्रकार रोखला गेला पाहिजे या मताचा मी देखील पुरस्कर्ता आहे. आपल्या याही मताशी मी सहमत आहे की, कार्यरत असणाया पत्रकारांनी पद्म पुरस्कार स्वीकारू नयेत. यामुळे त्यांच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्हं उभे राहते. सत्तेच्या वर्तुळात असणाया किंवा वर्तुळाच्या आसपास भटकणाया सर्वांना या पुरस्कारासाठी पात्र ठरविले जाते. हि बाब अगदी सरसकट लागू होत नाही यालाही काही सन्मामनिय अपवाद नक्कीच आहेत. मला वाटते असे अपवादच या पुरस्काराची शान वाढवितात. बाकी, तुम्ही उत्तराची वाट अजिबात पाहू नका. तुमच्या ब्लॉगवर प्रतिक्रिया मात्र ढीगाने मिळतील.
प्रेषक -गिरीश अवघडे,दिनांक - 2/7/2010 12:00:00 AM
मिलिंद खांडेकर यांचे म्हणणे खरे असले तरी त्यांनी जो एक आक्षेप घेतलाय, तो योग्य नाही. सहवाग आणि आचरेकर यांच्याआधी काही पत्रकारांना पद्म पुरस्कार मिळाला, हे खांडेकर यांना पटलेले नाही. मला वाटतं ही तुलना योग्य नाही. पद्म पुरस्कारांसाठी विविध क्षेत्रातील कर्तृत्वान व्यक्तींचा विचार केला जातो. सेहवाग, आचरेकर यांना क्रीडा क्षेत्रातील कर्तृत्वासाठी आणि पत्रकारांना साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी पुरस्कार मिळाला आहे. तुलनाच करायची झाल्यास सेहवाग, आचरेकरांची अन्य एखाद्या स्पोर्टस् संबंधित पद्म पुरस्कार विजेत्याशी करायला हवी. श्रीराम बापट यांनी मांडलेला मुद्दा अधिक योग्य आहे. पत्रकारांनी पद्म पुरस्कार (शेवटी हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे) जरूर स्वीकारावेत, परंतु आपली लेखणी कुणा सरकारची, राजकीय नेत्यांची बटिक होऊ देऊ नये. धन्यवाद.
प्रेषक -सुनील घुमे,दिनांक - 2/4/2010 12:00:00 AM
खरं तर पत्रकारांनी एकजूट दाखवली तर, सरकारलाही ते सहजी धारेवर धरु शकतात, आणि लोकांचाही त्यांना योग्य प्रकारे पाठिंबा मिळतो हे आपण जाणतोच. असं झाल्यास खरोखरंच कोणत्याच पुरस्काराची चेष्टा होणार नाही. आणि पद्मच काय इतर अनेक असे राज्य स्तरावरचे पुरस्कारही कसे विकले जातात हे देखिल प्रकाशात येऊन हा कारभार पारदर्शी चालण्यास मदत होईल.
प्रेषक -प्रज्ञा,दिनांक - 2/3/2010 12:00:00 AM
खरं तर पत्रकारांनी एकजूट दाखवली तर, सरकारलाही ते सहजी धारेवर धरु शकतात, आणि लोकांचाही त्यांना योग्य प्रकारे पाठिंबा मिळतो हे आपण जाणतोच. असं झाल्यास खरोखरंच कोणत्याच पुरस्काराची चेष्टा होणार नाही. आणि पद्मच काय इतर अनेक असे राज्य स्तरावरचे पुरस्कारही कसे विकले जातात हे देखिल प्रकाशात येऊन हा कारभार पारदर्शी चालण्यास मदत होईल.
प्रेषक -प्रज्ञा,दिनांक - 2/3/2010 12:00:00 AM
पद्म पुरस्कार हे देशाच्या प्रतिष्ठेचा अविभाज्य भाग आहेत.त्यामुळे पुरस्कारांची प्रतिष्ठा पणाला न लावता,व्यक्तिसापेक्ष अशी चर्चा होण गरजेचं आहे. पत्रकारही त्या वक्तीसापेक्षतेच्या बाहेर नाहीत .
प्रेषक -sunita rao ,दिनांक - 2/2/2010 12:00:00 AM
पद्म पुरस्काराची प्रतिष्ठा आता संपुष्टात आलीय. ज्याप्रमाणे स्वातंत्र्य सैनिकांचि प्रतीष्ठा बोगस स्वातंत्र्य सैनिकांमुळे झाकोळली गेली आहे तसेच पद्म पुरस्कार प्राप्त लोक सामांन्यांसाठी कुचेष्टेचा विषय ठरतील.
प्रेषक -प्रशांत अजिँठेकर,दिनांक - 1/31/2010 12:00:00 AM
It is wrong to think the govt. is bribing you when you (in this case the journalists ) are given Padma awards.All govt.decisions are subject to criticism and same is the case with padma awards. Being a good or bad journalist is very much relative and depends upon the readers leanings. Thus a real non partial journalist can easily be branded as procongress or pro BJP or proLeft and condemned. Best course for a journalist to follow will be to accept Padma award yet keep on criticising the wrong decisions/behaviour of the ruling (awarding) govt. and proove that he/she has not been bribed.
प्रेषक -Shriram Bapat,दिनांक - 1/31/2010 12:00:00 AM
Prev Next

तुमची प्रतिक्रिया नाव ई-मेल तुमचा संदेश      
तक्रार निवारण होम पेज  |  आम्ही कोण?  |  दोन्ही बाजूंनी संवाद  |  माझा जॉब करायचाय?  |  जाहिरात