follow us at facebooktwitteryoutube
अपडेट: 07.00 pm
  • फेसबुकच्या माध्यमातून 12 ऑक्टोबरला पुन्हा मीटर जाम  |  मुंबईत तीनशे ठिकाणी गणेश विसर्जनाची सुविधा, मनपाची माहिती  |  म्हाडा बांधणार अल्प, अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३१ हजार घरं  |  मध्यप्रदेश-देवासजवळ बस नदीत वाहून गेली, ५० जण बुडाल्याची भीती  |  ब्रिटनमध्येच शरण घेण्याची पाक क्रिकेटर मो. आसिफची इच्छा, द टेलिग्राफचं वृत्त  |  राष्ट्रकुलच्या बॅटन रिलेचं आज पुण्यात आगमन  |  गणरायाच्या आगमनाच्या पाश्वभूमीवर पोलिसांचं संपूर्ण साताऱ्यात जिल्हाभर संचलन  |  मंगलोर विमान अपघातात धक्कादायक खुलासा, मुख्य पायलट दीड तास झोपल्याचं उघड  |  
होम पेज
स्टार माझा
आम्ही कोण?
दिवसभरात
जॉब करायचाय?
कधी काय?
दोन्ही बाजूंनी संवाद
जाहिरात
माझा ब्लॉग
स्टोरीज ऑफ द डे
सहभागी व्हा
व्हिडिओ बघा
लोकप्रिय व्हिडीओ

महाराष्ट्र देशा

वेळ ०७.२०
महाराष्ट्र देशा
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला मेल करा
Note प्रायव्हसी पॉलिसी
 
 
 
माझा ब्लॉग


नशीबवान राहुल गांधी
संदीप रामदासी

“आतंकवादियोंने बंबईपे हमला किया, आतंकवादियोंको किसने मारा?
NSG के लडकोंने... NSG के लडके कौन थे? कहां के थे?
बिहार के थे, उत्तरप्रदेश के थे, बाकी हिंदुस्थान के थे..
उस समय नही बोला के भैया बिहार के लोगोंको भगाव यहां से,
उस समय बिल्कुल शांत था...
आतंकवादियोंको मारने आये है, हमे बचाने आये है भैया तो ठिक है,
बिहार के लोग है, कुछ मत बोलो...”

हे विधान केलंय राहुल गांधींनी, हेच विधान अबू, अमर, लालू, मुलायम यांनी केलं असतं तर?
महाराष्ट्रातले तमाम राजकारणी, प्रसारमाध्यमं त्यांच्यावर तुटून पडली असती.
त्यामुळेच राहूल गांधीं नशीबवान आहेत असं मी म्हणालो.
ज्या कुत्सितपणे खासदार राहुल गांधी यांनी हे विधान केलंय, त्यानं सुजाण मराठी माणूस निश्चित दुखावला गेलाय.

तुम्ही सध्याच्या राजकारण्यांपेक्षा वेगळे आहात असा समज सगळीकडे पसरत होता, तो दूर करायची एवढी कसली घाई ? आणि त्यासाठी २६/११ सारख्या घटनेचा वापर करणं याला दुर्दैव म्हणावं का तुमच्या (अपरिपक्व) राजकारणाचा भाग?31rahul.jpg

देशावर सर्वात मोठा अतिरेकी हल्ला झाला, त्याच्या जखमा अजूनही मनावर ताज्या आहेत.

मुंबईत उत्तरभारतीय राजकारण्यांच्या अरेरावीला विरोध, आणि देशावरचा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला यांचा असा संबंध लावणं हे फक्त स्वार्थी राजकारण्यांनाच जमू शकतं.

बहुतांश राजकारणी मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्यात पटाईत असतात असं सर्वसामान्य जनतेचं मत,  या थिल्लर राजकारणात किमान २६/११ तरी आणू नका.

राहुलजी, तुम्ही म्हणालात महाराष्ट्रात भेदभाव होतोय, त्याविरोधात मी बोलणारंच, शांत बसणार नाही... आनंद आहे, खरोखरच देशात काहीतरी चुकीचं होत असेल तर तुमच्यासारख्यांनी बोलालायच हवं. पण ज्यावेळी मुंबईत राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांच्या विरोधात आंदोलन सुरु केलं, त्याचवेळी तुम्ही का नाही बोललात?
काँग्रेसमध्ये तुमच्या शब्दाला किती महत्त्व आहे हे सारा देश जाणतो. मनसेचं आंदोलन चुकीचं आहे, हे तुम्हाला माहित होतं तर त्यावेळी सरकार तर तुमचंच होत ना! मग का नाही तुम्ही दबाब आणलात?
खरंतर असं काही तुम्ही त्यावेळी बोलला असतात तर मराठी माणूस नाराज झाला असता आणि त्याचा फटका निवडणुकीत बसला असता हे तुम्हाला चांगलं माहित होतं, म्हणूनच तुम्ही सोयीस्करपणे गप्प राहणं पसंत केलंत.

येत्या ५ वर्षात महाराष्ट्रात मोठ्या निवडणुका नाहीत, त्यामुळे आता महाराष्ट्राबद्दल काहीही बोलायला तुम्ही मोकळे झालात. आणि महाराष्ट्राला राष्ट्रप्रेमाचे धडे शिकवायला बिहारपेक्षा चांगली जागा तुम्हाला कुठे मिळाली असती? Marathas new.JPG

राहुलजी, सगळा मराठी माणूस सगळ्या उत्तरभारतीयांच्या विरोधात कधीच नव्हता, तसा तो विनाकारण विरोधात जाणारही नाही. पण मनसे-काँग्रेसच्या मतांच्या राजकारणात तसं चित्र मुद्दाम उभं केलं गेलं.

राज्यातल्या निवडणुका संपल्या तरी विचारांचा तो टेम्पो अजुनही कायम आहे कारण देशात कुठे ना कुठे निवडणुका चालूच असतात आणि हा मुद्दा मतं आणि सत्ता मिळवून देतो हे तुम्हा राजकारण्यांना चांगलं कळतं.
मतांच्या हव्यासापोटी आपण तमाम महाराष्ट्राचा, २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्यांचा अपमान करतोय याचं भान किमान तुम्ही तरी ठेवायला हवं होतं.

तुमच्या पणजोबांनी डिस्कव्हरी ऑफ इंडियात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती लिहिली तुम्ही तोच चष्मा घालून महाराष्ट्राकडं बघताय असं तुमचं बिहारमधलं बोलंण होतं. देशाचा इतिहास महाराष्ट्राशिवाय पूर्ण होत नाही हे विसरु नका. देशाच्या भविष्याला दिशा देण्याची जबाबदारीही महाराष्ट्र निश्चित पार पाडेल.


देशहिताचा विचार करणाऱ्या , विकासाचं राजकारण करणाऱ्या युवापिढीचा नेता म्हणून जी काही इमेज तुम्ही प्रयत्नपूर्वक निर्माण केलीत, तिला तडा देणारे हे तुमचे बोल होते. तुमच्याकडनं मोठ्या अपेक्षा बाळगणा-या महाराष्ट्रातील तरुणांचा भ्रमनिरास होण्याची ही सुरुवात आहे.
पण महाराष्ट्राचा,मराठी लोकांच्या भावनांचा विचार जिथे आपले नेतेच करत नाहीत तिथे राहूलजी, तुमच्याकडून अपेक्षा तरी किती करायच्या?


प्रतिक्रिया
1761 madhye jhalele Panipatche yudha rahul Gandhi visarale vatat jar te visarale nasate tar tyanhi ase vaktavya kel nasat
प्रेषक -Rajesh lambe,दिनांक - 2/22/2010 12:00:00 AM
jai maharastra.apalaya matachi dishach marati manasala nakki patel
प्रेषक -gandhi raj,दिनांक - 2/19/2010 12:00:00 AM
Rahulchaya hya bolnyamule pratek marathimanus nirash zala ani dukhawalya gela hyat dumat nihiye Tyache pratisad nakkich umattil. Me pan aplya matashi sahamat ahe SSNAKAT 17/2/10
प्रेषक -ssnakat,दिनांक - 2/17/2010 12:00:00 AM
Agadi barobar aahe,ekdam shaljoditale dilet tumhi bhartachya bhavi P.M.la.Tumche nirikshan n numan dad denya joge aahe.nishcit rahul baba amchya manatun utrat chalala aahe.gandhi privt lim co.{cong[i]}media la hathshi dharun lokana ullu banwat aahe.
प्रेषक -Ravi khandve,दिनांक - 2/15/2010 12:00:00 AM
vaa Sandeep Chaan lihles. Kharach Ya aslya pilavalila Maharashtramadhye campaigning karu dene mhanaje swatahachya ghari swatahachi laaj kadhun ghene aahe. Rahulbaba tumhi tumchya smiling face cha vaapar fakta congress chya poster var kelela bara oogach kaahitari bolal aani thobadavar aaptaal. ajunahi Marathi tarunachya mangtat bharpur taakad aahe Atirekyanshi zagdnyachi. .... tenvha jara japun.........
प्रेषक -Shripad Ramdasi,दिनांक - 2/15/2010 12:00:00 AM
Sandip ur right majha bhau aahe congress madhey aani rahul gandhichya ya vidhana nantar tyachi hi congress madhey ghusmat hot aahe zenda madhala dilog barobar aahe maarto to pan quotkarykartaquot ani maar khato to pan quotkarykartaquot quotnetaquot nahi ya netyani ashi vidhane karayachi ani karykartyani fukat cha traas sahan karaycha bas baki kaay bolanar bas yevadhech bolato quotaajwar jyanchi wahili palakhi u.p. Bihar madhey tyancha dev hotaquot
प्रेषक -Prasad p. Patil,दिनांक - 2/15/2010 12:00:00 AM
रमेश सोनारji, Rahul gandhi ani Gandhi gharaane he kaahi sant nahit ki tyanchyaawar kelelyaa tikelaa koni aagpaakhad mhanawe. Gandhi gharaanyaane balidaan kele wagare ase gair samaj samaajat tumachyaamule pasaranyaas madat hotey. 1600 police gheoon phiranaare kadhich shoor samajale jaat naahit. Tyaamule ashaa dhongee lokaanche uddattikaran tumhi please karoo naka. संदीप रामदासी, Tumachaa lekh mala khoop aawadala. Aajkalchyaa wikalyaa gelelyaa mediamadhye ashi kharee batami denaaree manase aahet yaawar maza wishwaas navhata! Tumache abhinandan.
प्रेषक -Nachiket Bhingarde,दिनांक - 2/14/2010 12:00:00 AM
26/11 Nantar Chidmabaram Mhanale Hote Ki, Ya Pudhe Asa Hala Khapaun Ghetla Janar Nahi, Jar Kela Tar Amhi Pakistanla Pratiuttar Devu Tar Chidambaram Yani Pune Bomb Spotat Yevdha Dhile Panani Nished Ka Kela.
प्रेषक -Ajit Shinde,दिनांक - 2/14/2010 12:00:00 AM
Me Purna pane sahamat ahe Sandip Ramdasi yanchya Baddal Pan mala ek prashna Vicharayacha ahe Mr.Sonar yana ki Gandhi gharayana ni balidan dili ahe tyat Rahul gandhich akay sahabagha ahe Te rajiv gandhiche putra ahet ya palikade kahi nahi as mala vatte ani itakya divsani jhevha Uttar pradesh ch prakaran shant hot ahe tevhach ashya goshti ka karavyat ani amhi Maharshtar cha Vikas kel tasa tyani tikadcha krava amhlach jast anand hoil.Jevha aple sarv Police shahid jhale ani NSG.che javan Shahid jhale teva kuthe hote He Rahul GAndhi? Aj Bolayala sagale puthe Pan vel ale tevha konich bolat nahi he jast khant ahe.Rahul Gandhi na he prakaran vadhvnyat jast Intrest ahe ase disata ahe.
प्रेषक -yogesh,दिनांक - 2/14/2010 12:00:00 AM
sandeepji yogya shabdat apan apan pratkria mandli ahe ghandhi navamule yani sagla fayda ghetla ahe.
प्रेषक -vijay palande,दिनांक - 2/13/2010 12:00:00 AM
Prev Next

तुमची प्रतिक्रिया नाव ई-मेल तुमचा संदेश      
तक्रार निवारण होम पेज  |  आम्ही कोण?  |  दोन्ही बाजूंनी संवाद  |  माझा जॉब करायचाय?  |  जाहिरात