follow us at facebooktwitteryoutube
अपडेट: 07.00 pm
  • फेसबुकच्या माध्यमातून 12 ऑक्टोबरला पुन्हा मीटर जाम  |  मुंबईत तीनशे ठिकाणी गणेश विसर्जनाची सुविधा, मनपाची माहिती  |  म्हाडा बांधणार अल्प, अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३१ हजार घरं  |  मध्यप्रदेश-देवासजवळ बस नदीत वाहून गेली, ५० जण बुडाल्याची भीती  |  ब्रिटनमध्येच शरण घेण्याची पाक क्रिकेटर मो. आसिफची इच्छा, द टेलिग्राफचं वृत्त  |  राष्ट्रकुलच्या बॅटन रिलेचं आज पुण्यात आगमन  |  गणरायाच्या आगमनाच्या पाश्वभूमीवर पोलिसांचं संपूर्ण साताऱ्यात जिल्हाभर संचलन  |  मंगलोर विमान अपघातात धक्कादायक खुलासा, मुख्य पायलट दीड तास झोपल्याचं उघड  |  
होम पेज
स्टार माझा
आम्ही कोण?
दिवसभरात
जॉब करायचाय?
कधी काय?
दोन्ही बाजूंनी संवाद
जाहिरात
माझा ब्लॉग
स्टोरीज ऑफ द डे
सहभागी व्हा
व्हिडिओ बघा
लोकप्रिय व्हिडीओ

महाराष्ट्र देशा

वेळ ८.००
8 PM विशेष
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला मेल करा
Note प्रायव्हसी पॉलिसी
 
माझा ब्लॉग

महाराष्ट्र हलाखीत....मंत्री घरसजावटीत दंग
निलेश खरे

 काँग्रेस का हाथ आम आदमी के साथ... हा नारा आता बदलण्याची गरज आहे. कारण आम आदमीची चिंता काँग्रेस राष्ट्रवादीला नसल्याचं दिसतय. राज्यासमोर महागाई, पाणीटंचाई यांसारख्या समस्या असताना काँग्रेस राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी आपल्या सरकारी निवासस्थानाच्या रिनोव्हेशनवर कोट्यवधी रुपये खर्च केलेत. त्यामुळे राज्याचा चेहरा मोहरा नाही पण मंत्र्यांच्या बंगल्यांचा चेहरामोहरा नक्कीच बदललाय.वर्षा बंगला... महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं निवासस्थान... राज्याची सूत्रं गेल्या 30 वर्षांपासून याच बंगल्यातून हलतायत... त्यामुळं साहजिकच वर्षाचं वैभवही त्याला साजेसच असणार... बंगल्याच्या प्रवेशद्वारापासून इथंली प्रत्येत वस्तू खास आहे. मात्र अशोक चव्हाण इथली 0000blog.jpgप्रत्येक बाब आपल्या मनाप्रमाण बदलू इच्छितायत.. कदाचित त्यांना माजी मुख्यमंत्री आणि त्यांचे अंतर्गत विरोधक विलासरावांची प्रत्येक आठवण या बंगल्यातून पुसून टाकायची असेल... त्यामुळे  वर्षातील प्रत्येक कोपरा अन् कोपरा रिनोव्हेट केला जातोय. आणि त्यासाठी आतापर्यंत तब्बल 96 लाख रूपये खर्च आलाय. त्याचबरोबर मुख्यमंत्री बंगल्यातील कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या तोरणा बंगल्यावरही 65 लाख रुपये खर्च प्रस्तावित आहे. फक्त मुख्यमंत्रीच नाही तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या 17 मंत्र्यांनी आपआपल्या बंगल्यांच्या रिनोव्हेशनसाठी लाखो रुपये पाण्यासारखे खर्च केलेत.

1. उपमुख्यमंत्री छगन भुजबळांनी रामटेक बंगल्यावर  43 लाख रुपये खर्च केलेत.
विशेष म्हणजे छगन भुजबळ गेली १० वर्ष मंत्री असताना आणि नसताना याच बंगल्यात राहतात  

2. राष्ट्रवादीचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या सातपुडा बंगल्याच्या रिनोव्हेशनसाठी तब्बल 88 लाख रुपये खर्च केलेत. 

3. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या उपवन बंगल्याच्या रिनोव्हेशनसाठी 71 लाखांचा चुराडा केलाय़.

4.  १ लाख ५० हजाराचं कोटी रुपयांचं कर्ज असणा-या राज्याचे अर्थमंत्री सुनील तटकरेंनी मधुदंत बंगल्यावर 50 लाख रुपये खर्च केलेत.

5. महसूलमंत्री राणेंनी आपल्या ज्ञानेश्वरी निवासस्थानासाठी 44 लाख 50 हजार रुपये पाण्यासारखे खर्च0blog.JPG केलेत.

6. विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी आपल्या अजंठा बंगल्यावर 34 लाख रुपये खर्च केलेत.

7. तर परिवहन मंत्री राधाकृष्ण विखेंनी सागर निवासस्थानाच्या रिनोव्हेशनवर 40 लाखांचा चुराडा केलाय.

8. उर्जामंत्री अजित पवारांनी देवगिरी बंगल्यावर 29 लाखांचा खर्च केला

9. विधानसभेचे सभापती वळसे पाटील यांनीही शिवगिरी बंगल्यावर 39 लाखांचा चुराडा केलाय.

10. कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सेवासदन बंगल्यावर  26 लाखांचा खर्च केलाय.

11. ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी रॉयलस्टोन बंगल्यावर  38 लाख रुपये खर्च केलेत

12. तर उद्योग मंत्री राजेंद्र दर्डांनी बंगल्याच्या रिनोव्हेशनसाठी  38 लाख रुपयांचा चुराडा केलाय.

कोट्यवधी रुपयांच्या चुराड्याच मुख्यमंत्र्यांना मात्र काहीच सोयरसुतक नसल्याचं दिसतय. या सगळ्या मंत्र्यांच्या 000blog.jpgघरांवर आतापर्यंत 8 कोटीं रुपयांचा चुराडा झालाय. राज्यासमोर सद्यस्थितीला अनेक संकटं आहेत. पाणीटंचाईमुळे लोकांना मैलोनमैल वणवण करावी लागतेय. महागाईमुळे सामान्यांचं जगणं अवघड झालय. अशा अवस्थेत राज्य सरकारमधील मंत्री आपल्या घरांची शानोशौकत वाढवण्यात मश्गुल आहेत. त्यासाठी लोकांच्या खिशातून आलेल्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला जातोय. नेत्यांनी केलेला खर्च विकासकामांपेक्षा गरजेचा होता का?

प्रतिक्रिया
swatache ghar bharayala tar pudhari hotat, janteshi hyancha faqt 5 varshatun ekda sambandh, ekda nivdale khurchi milali ki he faqt udghatan sohale, wadhdivas, purskar aani ghoshanaabaji hyatach guntalele astaat ashana maharashtratil jantene dhada shikwilach paahije. sachin 8007778827
प्रेषक -sachin s. pable,दिनांक - 4/5/2010 12:00:00 AM
aho hich tar khari congress chi jaat. quotmantri tupasi garib upasiquot ashich tara hya congress ne maharshtrachi keleli aahe lok khase kay nivdun dethat hech kalat nahi.
प्रेषक -akakde,दिनांक - 3/31/2010 12:00:00 AM

LOKSHAHI MADHYE APLYALA APLYA LAYKI PRAMANECH RAJYAKARTE MILTAT.TEVHA ATA PASCHATAP KARUN KAHI PHARAK PADNAR NAHI
प्रेषक -Gaurang,दिनांक - 3/28/2010 12:00:00 AM
mala hya sarkarch yawada santap yeto naa pan karnar kaay,kaaran marathi janata samjun ghet nahi. congress garibala sukhani jagun denar nahi.tevha malha ek sangavasa watath ki marathi manus ek houn manasela ekda sandhi deun baghuya .jay maharashtra. preshak sanket yewale.date27\3\2010.12:45PM
प्रेषक -sanket shyam yewale ,दिनांक - 3/27/2010 12:00:00 AM

yalach tar mhantat vikas farak fakt evadhach ki to rajyacha vikas nasun Mantryanchya banglyacha vikas ahe.ata pudhyachya election madhe Janatene VIKAS ya shabd cha arth samjun ghetala pahije.
प्रेषक -Ravi,दिनांक - 3/27/2010 12:00:00 AM
hey tar faar faar chan zale Sundar Ghar konala nako aaste far nasibwaan ahet te nahi tar te Kurla Bail Bazar che garib... sawtache ghar aasun pan begghar kele hay congress sarkarne. tya garib ne ter dagdagine, mangalsutra vikun karz ghetle va court kacheri, vakil, Dalal yanchya ghashayat othle tri suddha tayana ghar nahi milale. milale ti fakt tarikh ver tarikh aaaatttaaa tumi saanga kiti nasibwaan aahe he BhikarPudhari Voting karun fakt Sarkar badalte prashn (Question) sutat nahi. Tyasathi Vichar badla. Ladha tutun pada. Jeeten 9930672724
प्रेषक -Jeet007,दिनांक - 3/26/2010 12:00:00 AM

Prev Next

तुमची प्रतिक्रिया नाव ई-मेल तुमचा संदेश      
तक्रार निवारण होम पेज  |  आम्ही कोण?  |  दोन्ही बाजूंनी संवाद  |  माझा जॉब करायचाय?  |  जाहिरात