follow us at facebooktwitteryoutube
अपडेट: 08.00 am
  • राष्ट्रकुलच्या बॅटन रिलेचं आज पुण्यात आगमन  |  गणरायाच्या आगमनाच्या पाश्वभूमीवर पोलिसांचं संपूर्ण साताऱ्यात जिल्हाभर संचलन  |  मंगलोर विमान अपघातात धक्कादायक खुलासा, मुख्य पायलट दीड तास झोपल्याचं उघड  |  मी ज्योतिषी नाही, महागाईवर पंतप्रधान मनमोहनसिंह यांचं वक्तव्य  |  बेस्ट दरवाढीला मनपा सभेत मंजुरी, मध्यरात्रीपासून बेस्टची दरवाढ लागू  |  राम जन्मभूमी-बाबरी मशीद वाद; अलाहाबाद हायकोर्टाकडून 24 सप्टेंबरला निर्णयाची शक्यता  |  दादर टर्मिनस हाणामारीप्रकरणी नारायण राणे, संजय राऊत यांच्यासह 250 जणांवर गुन्हे  |  उदगीरमध्ये शिजला जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाचा कट  |  पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी दोघे ताब्यात, 8 महिन्यांनंतर ATSला मोठं यश  |  अभिनेता शायनी अहुजावरील बलात्काराचे आरोप खोटे?-मोलकरणीचं घुमजाव  |  
होम पेज
स्टार माझा
आम्ही कोण?
दिवसभरात
जॉब करायचाय?
कधी काय?
दोन्ही बाजूंनी संवाद
जाहिरात
माझा ब्लॉग
स्टोरीज ऑफ द डे
सहभागी व्हा
व्हिडिओ बघा
लोकप्रिय व्हिडीओ

नमस्कार महाराष्ट्र

वेळ ८.२०
दिवस माझा
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला मेल करा
Note प्रायव्हसी पॉलिसी
 
 
 
माझा ब्लॉग


...तर लादेनही खळखळून हसेल
मिलिंद खांडेकर

गेल्या नऊ वर्षांपासून अख्खं जग ओसामा बिन लादेनच्या टेप बघतंय आणि ऐकतंय. प्रत्येकवेळी या टेप प्रदर्शित झाल्यावर सर्वप्रथम मनात प्रश्न येतात...हे सगळं शूट कुठं होत असेल ? लादेन अद्याप जिंवत आहे ? की अमेरिकाच या टेप बनवून जगभरात वाटतेय ? या प्रश्नांच्या कोंडाळ्यावरच अभिषेक शर्मानं तेरे बिन लादेन हा सिनेमा बनवला. अभिषेक शर्माची ही फिल्म अमेरिका, पाकिस्तान आणि समग्र न्यूज चॅनेल्सवरच हसतेय. जगाच्या पाठीवर कुठं लादेन जिवंत असेलच आणि त्यानं हा सिनेमा बघितलाच तर तोही खदखदा हसेल.

तेरे बिन लादेन चं कथानक पाकिस्तानातल्या कराचीत फुलतं. सिनेमाचा हिरो अली हसन अमेरिकेवर झालेल्या 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अवघ्या तीन दिवसांनीच अमेरिकेत नोकरीसाठी निघतो, मात्र दहशतवादी हल्ल्यानं घाबरलेल्या अमेरिकेतून हसन अलीला दहशतवादी समजून पुन्हा पाकिस्तानात पाठवलं जातं. अमेरिकेतल्या न्यूज 0000mi.jpgचॅनेलमध्ये काम करण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या हसन अलीला कराचीतल्या डंका नावाच्या चॅनेलचा पत्रकार बनावं लागतं. डंका चॅनेलचा मालक असलेला संपादकही हसन अलीला कोणत्याही कामासाठी लायक समजत नसतो. हसन अलीचं अमेरिकेला जाण्याचं स्वप्न मात्र राहून-राहून डोकं वर काढतंय. अमेरिकेला पाठवण्यासाठी एक एजंट हसन अलीला 10 लाख रुपयांची मागणी करतो आणि याच काळात हसन अलीच्या डंका टीव्हीतल्या नोकरीवरही टांगती तलवार येते. हसन अलीला डंका टीव्हीचा संपादक कोंबड्यांच्या बांगेच्या अनोख्या शर्यतीच्या कव्हरेजला पाठवतो आणि यावेळी स्टोरी व्यवस्थित झाली नाही तर तुझी नोकरीही गेली म्हणून समज असा इशाराही देतो.  

झालं...हसन अली कोंबड्य़ांच्या बांगेच्या शर्यतीचं कव्हरेज करतो मात्र कव्हरेज असं होतं की आता नोकरी जाणारच असं हसन अलीला वाटतं आणि त्याचवेळी हसन अलीची नजर एका फोटोकडे जाते...कोंबड्यांच्या बांगेच्या शर्यतीत विजेता ठरलेल्या कोंबड्याचा मालक नूर पाशा....अगदी हुबेहूब ओसामा बिन लादेन..! हसन अली लादेनसाऱखा दिसणाऱ्या नूर पाशाला फसवून त्याची टेप बनवतो. अमेरिकेला धमक्या आणि इशारे देणारी ती टेप डंका टीव्हीच्याच संपादकांना 10 लाखांना विकतो. ती टेप भारतातील चॅनल्स आणि अमेरिकेत पोहोचते आणि ही नकली टेप असा काही आगंडोंब उसळवते की बस्स...अमेरिका कोणतीही पडताळणी न करता सरळ अफगाणिस्तानवरच हल्ला चढवते.
 
इकडे हिरो हसन अलीकडे अमेरिकेला जाण्यासाठी लागणारे 10 लाख रुपये तर येतात पण अमेरिका-अफगाणिस्तान 000mi.jpgयुद्धाच्या पार्श्वभूमिवर एजंटला आपला कारभार गुंडाळवा लागतो. अमेरिकेचे गुप्तहेर पाकिस्तानात घुसून शोधमोहीम सुरू करतात. एका खोट्या टेपमुळं घाबरलेली अमेरिका कशी धास्तावलीय आणि कशी अंधारात बाण मारण्याचे उद्योग करते हे पाहायला अतिशय मजेशीर वाटतं. अमेरिकेचा एक गुप्तहेर दुसऱ्या गुप्तहेराकडे टेपमध्ये लादेनच्या मागचा नकाशा उर्दूत असल्यानं लादेन पाकिस्तानातच असल्याचा अंदाज व्यक्त करतो. तेव्हा तो गुप्तहेर मग तुम्ही अफगाणिस्तानात मिसाईलचा मारा का करताय ? असा सवाल करतो. तेव्हा पहिला गुप्तहेर सांगतो की एक अब्जाचं बजेट त्याला पाकिस्तानात बसून कॉफीचे झुरके घेण्यासाठी दिलेलं नाहीय. असो...

या सगळ्या गडबडीत अमेरिका आणि पाकचे गुप्तहेर नूर पाशा म्हणजेच नकली लादेनपर्यंत पोहोचतात आणि सगळं सत्य समोर येतं. एका नकली लादेन आणि नकली टेपनं जगाला आणि अमेरिकेला उल्लू बनवलेलं समजल्यावर गुप्तहेरही डोक्याला हात लावतात. पण या खोट्या नाट्यावर पडदा टाकण्यासाठी आणखी एक खेळ खेळला जातो. हसन अली नकली लादेनची मुलाखत घेतो आणि टेपमधली व्यक्ती खरोखरचा लादेन आहे असं सांगून टेप प्रदर्शित केली जाते. या मुलाखतीतून लादेन अमेरिकेला शस्त्रसंधीची (शस्त्र खाली ठेवण्याची) ऑफर देतो आणि व्हाईट हाऊस ही ऑफर तात्काळ मान्य करतं...अमेरिकेसह जगभरात शांततामय वातावरण निर्माण होतं.


माफ करा...सिनेमावर लिहता लिहता अख्खी कथाच सांगण्याचा मोह आवरता आला नाही. सिनेमाची मजा तिच्या कथानकापेक्षा कथानक गुंफण्यासाठी जे वातावरण पडद्यावर उभं केलंय त्याच्यात आहे. प्रत्येक क्षणाला हास्याची कारंजी उडतात.

जाता-जाता एक नोंद..की मीडियावर भाष्य करण्याचा मोह आता चित्रपटांनाही टाळता येत नसल्याचं दिसतंय. पुढच्या महिन्यात पिपली लाईव्ह येतोय. रण येऊन तोंडावर आपटलाय. लव्ह, सेक्स और धोका ची चलती झालीय. तेरे बिन लादेनही चालतोय. कदाचित पिपली लाईव्हही चालेल...चालणाऱ्या सिनेमांत एक साम्य आहे. नवे अभिनेते..छोटं बजेट आणि चांगल्या कथानकाची चांगली गुंफण..! बॉलिवूडच्या मोठ्या स्टार्सनी जो धडा घ्यायला हवा तोच धडा न्यूज चॅनेल्सनीही घ्यायला हवा.     


प्रतिक्रिया
this story very humrous so this picture r deffinetrly comedy.
प्रेषक -raj gupta,दिनांक - 8/14/2010 12:00:00 AM
sir, last sentensce madhe Dam aahe....
प्रेषक -vinayak patil,दिनांक - 8/12/2010 12:00:00 AM
Milind Khandekar tumchya LEKHAchi pratekane Dakhal ghyawi. Star Majha STAR OF NEWS Channels
प्रेषक -ambradkar.rb,दिनांक - 8/5/2010 12:00:00 AM
I like the story.when picture is coming i watch these.thanks star majha for publishing this story.
प्रेषक -supriya gaikwad,दिनांक - 8/1/2010 12:00:00 AM
good film aani lihale sudhha chhanach............
प्रेषक -manoj sangle,दिनांक - 8/1/2010 12:00:00 AM
Sir, aapla channel ha atyanta lokpriya aahe. Batmya ekdam barobar aastat. tasech aaple patrakarar he khup changle kam kartat. mazya purna parivara tarfe aapna sarvanche man:purvak abhinandan. Ramesh Lonkar. 9821562009. sauma11@yahoo.com
प्रेषक -ramesh lonkar. dombivli.,दिनांक - 7/31/2010 12:00:00 AM
I feel starmajha is really my channel.
प्रेषक -vidya kharje,दिनांक - 7/29/2010 12:00:00 AM
नवे अभिनेते..छोटं बजेट आणि चांगल्या कथानकाची चांगली गुंफण..! बॉलिवूडच्या मोठ्या स्टार्सनी जो धडा घ्यायला हवा तोच धडा न्यूज चॅनेल्सनीही घ्यायला हवा. ................... ह््या वाक््यात तुम््हाला नेमकं काय मांडायचंय.चॅनेल््समध््ये काम करणाऱ््या मुलांनी आहे त््या पगारात समाधान मानावं....आणि चॅनेल््ससाठी दिवसरात्र काम करत रहायचे.
प्रेषक -dipesh gurav,दिनांक - 7/28/2010 12:00:00 AM
Kharach chan story blog lihila aahe aani bstar majha varch blog chanach astat,tyababat prashnach nahi.Mihi star majhacha 1 motha fan aahe.This is my faurite news channelllllllllll.I love u star majhaaaaaaaaaaa.
प्रेषक -Yogesh Bhogate,दिनांक - 7/28/2010 12:00:00 AM
starmajha is a best news channel. I see starmajha everday for latest news
प्रेषक -Amol Tirlotkar,दिनांक - 7/25/2010 12:00:00 AM
Prev Next

तुमची प्रतिक्रिया नाव ई-मेल तुमचा संदेश      
तक्रार निवारण होम पेज  |  आम्ही कोण?  |  दोन्ही बाजूंनी संवाद  |  माझा जॉब करायचाय?  |  जाहिरात