follow us at facebooktwitteryoutube
अपडेट: 07.30 am
  • मंगलोर विमान अपघातात धक्कादायक खुलासा, मुख्य पायलट दीड तास झोपल्याचं उघड  |  मी ज्योतिषी नाही, महागाईवर पंतप्रधान मनमोहनसिंह यांचं वक्तव्य  |  बेस्ट दरवाढीला मनपा सभेत मंजुरी, मध्यरात्रीपासून बेस्टची दरवाढ लागू  |  राम जन्मभूमी-बाबरी मशीद वाद; अलाहाबाद हायकोर्टाकडून 24 सप्टेंबरला निर्णयाची शक्यता  |  दादर टर्मिनस हाणामारीप्रकरणी नारायण राणे, संजय राऊत यांच्यासह 250 जणांवर गुन्हे  |  उदगीरमध्ये शिजला जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाचा कट  |  पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी दोघे ताब्यात, 8 महिन्यांनंतर ATSला मोठं यश  |  अभिनेता शायनी अहुजावरील बलात्काराचे आरोप खोटे?-मोलकरणीचं घुमजाव  |  
होम पेज
स्टार माझा
आम्ही कोण?
दिवसभरात
जॉब करायचाय?
कधी काय?
दोन्ही बाजूंनी संवाद
जाहिरात
माझा ब्लॉग
स्टोरीज ऑफ द डे
सहभागी व्हा
व्हिडिओ बघा
लोकप्रिय व्हिडीओ

सात बाराच्या बातम्या

वेळ ८.००
नमस्कार महाराष्ट्र
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला मेल करा
Note प्रायव्हसी पॉलिसी
 
 
 
माझा ब्लॉग


विकिलिक्सने अफगाण वॉर डायरी ओपन केली म्हणून....
सचिन ढवण

कुठलीही माहिती कॉन्फिडेन्शियल या गोंडस नावाखाली लपवण्याचा कोणत्याही सरकारचा कल असतो. हे फक्त भारतातच होतं असं नाही, तर जगभरातील विविध देशातील सत्ताधारी हेच करताना दिसतात. हे आठवण्याचं कारण आहे सध्या जगभरात गाजत असलेली विकिलिक्सवरची अफगाण वॉर डायरी .

अफगाणिस्तानात अमेरिका प्रशासन कसा अत्याचार करत आहे, हे जगाला वेगळं सांगण्याची गरज नाही. पण विकिलिक्स डॉट ऑर्ग (http://wikileaks.org/) या वेबसाईटवर अफगाण वॉर डायरी या नावानं त्याचे अधिकृत पुरावे उपलब्ध झालेत. विशेष म्हणजे अमेरिकेच्या ताब्यातील तब्बल 91 हजार पानांचं सीक्रेट डॉक्युमेंट विकिलिक्सनं अफगाण वॉर डायरी या नावानं उघड केलंय.

भारतीयांवर हल्ले करण्यासाठी पाकिस्तानच्या आयएसआयनं तालिबानला सुपारी दिली होती असंही या रिपोर्टमधून उघड झालंय. अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासावर झालेल्या हल्ल्यांची गुप्तचर संस्थांना माहिती होती. मात्र त्यावर जाणीवपूर्वक काहीही कारवाई करण्यात आली नाही असं या रिपोर्टमधून समोर आलंय. या रिपोर्टमुळं जगभरात खळबळ उडालेली असताना अमेरिकन सरकारनं हा रिपोर्ट उघड करणाऱ्यांचा निषेध केलाय. यामुळं अमेरिकन नागरिकांच्या जीवाला धोका असल्याचा सूरही अमेरिकन प्रशासनानं आळवलाय.
 
जुलै 2008 मध्ये काबूलमधील भारतीय दूतावासावर तालिबान्यांनी हल्ला केला. त्यात 41 जण मृत्युमुखी पडले. यामध्ये दोन भारतीय मुत्सद्दीसुद्धा मरण पावले. या हल्ल्याची माहिती सहा दिवस आधी म्हणजेच 1 जुलै 2008 ला पोलंडच्या गुप्तचर विभागानं अमेरिकेला दिली होती. तसेच येणाऱ्या काळात तालिबानींच्या निशाण्यावर प्रामुख्यानं भारतीय इंजिनिअर, डॉक्टर, आणि कामगार असतील अशी माहितीही पोलंडच्या गुप्तचर विभागानं दिली होती. असं या रिपोर्टमधून उघड झालंय.

ही सर्व माहिती सबळ पुराव्यांनिशी इंटरनेटवर प्रसिद्ध झाल्यानं अमेरिकन अधिकाऱ्यांचं पित्त खवळलंय. अमेरिकेनं ही माहिती पुरवणाऱ्या व्यक्तीचा आणि ती प्रसिद्ध करणाऱ्या संस्थेचा, थोडक्यात विकिलिक्सचा निषेध केलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनासुद्धा याप्रकरणी वक्तव्य करण्यास भाग पडलंय.

विकिलिक्स काय आहे?

विकिलिक्स ही स्वीडनमधील आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी इंटरनेट संस्था आहे. विविध देशांच्या सरकारची, कंपन्यांची गुप्त माहिती इंटरनेटद्वारे उघड करण्याचं काम ही संस्था करते. 2006 पासून विकिलिक्सचं काम सुरु झालं असलं तरी, जानेवारी 2007 मध्ये ही वेबसाईट सर्वांसाठी खुली झाली. द सनशाईन प्रेस नावाची संस्था ही वेबसाईट चालवते. विशेष म्हणजे या वेबसाईटला गुप्त माहिती पुरवणाऱ्यांची नावं कधीही उघड होत नाहीत. त्यामुळंच वेबसाईट लॉन्च झाल्यापासून एका वर्षाच्या आत या साईटवर बारा लाख गुप्त डॉक्युमेंट अपलोड करण्यात आली. नेत्यांचे, सरकारी अधिकाऱ्यांचे भ्रष्टाचार, त्यांचे हितसंबंध विकिलिक्सनं उघडे पाडले. त्यामुळे गेल्या तीन-साडेतीन वर्षात जगभरातील सरकारांनी विकिलिक्सचा धसका घेतलाय.

विकिलिक्स नक्की कोणी सुरु केली केली, याबाबत माहिती नसली तरी ज्युलियन असांज हा ऑस्ट्रेलियन तरुण या वेबसाईटचा मुख्य संपादक आणि प्रवक्ता आहे. ज्युलियनला जगभरातील प्रसारमाध्यमं विकिलिक्सचा संस्थापक संचालक समजतात. ज्युलियन मात्र हे नम्रपणे नाकारतो. ज्युलियन हा पत्रकार आणि इंटरनेट अॅक्टिव्हिस्ट आहे.

तुम्हा आम्हा सगळ्या नेटिझन्सना विकीपिडिया माहिती असतं. कोणतीही माहिती, क्षणार्धात तुमच्या समोर सादर करणारा हा ज्ञानकोष प्रत्येक नेटिझनचा वाटाड्या असतो. आता गाजत असलेलं विकीलिक्स हेही या विकीपिडियाचंच लहान भावंड आहे.   julian 2707.jpg

विकिलिक्सचं काम कसं चालतं?

जानेवारी 2010 मध्ये विकिलिक्ससाठी पूर्णवेळ काम करणाऱ्यांची संख्या फक्त पाच होती. आता गरजेनुसार पूर्णवेळ काम करणाऱ्यांची संख्या सुमारे आठशे आहे. विशेष म्हणजे यातील कुणालाही कसलाही मोबदला दिला जात नाही. विकिलिक्सला ऑफिशिअल हेडक्वार्टर म्हणजे कार्यालयसुद्धा नाही.

विकिलिक्सवरचे रिपोर्ट हे कधीही खोटे नसतात असा दावा या वेबसाईटनं केलाय. रिपोर्टची व्यवस्थित पडताळणी करुनच ते वेबसाईटवर अपलोड होतात असं त्यांचं म्हणणं आहे. चुकीच्या रिपोर्टसाठी मेनस्ट्रीम मीडिया आहे, त्यासाठी विकिलिक्सची गरज नाही असा उपरोधिक टोलाही विकिलिक्स हाणतं.

विकिलिक्सच्या वेबसाईटचा वार्षिक खर्च दोन लाख युरो आहे. यातील बहुतांश खर्च हा सर्व्हर आणि ब्युरोक्रसीत होतो. सध्या विकिलिक्ससाठी स्वयंसेवी पद्धतीनं काम चालतं, हेच काम पैसे देऊन करायचं ठरवल्यास याच्या तिप्पट म्हणजे अंदाजे सहा लाख युरो खर्च (भारतीय रूपयांमध्ये साडेतीन कोटी रूपयांपेक्षा थोडा जास्त) येईल. कायद्याची लढाई लढताना विकिलिक्सला असोसिएटेड प्रेस, द लॉस एंजेलिस टाईम्स, नॅशनल न्यूज पेपर पब्लिशर्स असोसिएशन यांसारख्या मीडिया ऑर्गनायझेशन लाखो डॉलरची मदत करतात.

विकिलिक्सनं आजपर्यंत लिक केलेली माहिती-

  1. ऑगस्ट 2007 मध्ये विकिलिक्सनं केनियाचे नेते डॅनियल अराप मोई यांच्या कुटुंबाचा भ्रष्टाचार उघड केला होता.
    सप्टेंबर 2008 मध्ये अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणाऱ्या सारा पालिन यांच्या हॅक केलेल्या याहू ई मेल अकाउंटची माहिती विकिलिक्सनं उघड केली होती. त्यांनी पब्लिक रेकॉर्ड कायद्याचा भंग करत पर्सनल ई मेल आयडीचा उपयोग केला होता.
  2. जानेवारी 2009 मध्ये युएनचे सहाशे रिपोर्ट विकिलिक्सनं उघड केले होते, त्यातील 60 रिपोर्ट स्ट्रिक्टली कॉन्फिडेन्शियल होते.
  3. जानेवारी 2009 मध्येच पेरुच्या पेट्रोगेट ऑईल स्कॅन्डलमधील गुप्त माहितीला विकिलिक्सनं सुरुंग लावला.
  4. नोव्हेंबर 2009 मध्ये 9/11 च्या हल्ल्यानंतर पेंटागॉन आणि न्यूयॉर्क पोलीस यांच्यातले पेजरवर पाठवलेले 5 लाख 70 हजार इंटरसेप्ट विकिलिक्सनं जगासमोर आणले.
  5. जगभरातील सत्ताधाऱ्यांमध्ये गेल्या काही वर्षात विकिलिक्सनं चांगलीच दहशत पसरवलीय. कम्युनिस्ट चीननं जानेवारी 2007 पासून विकिलिक्सवर बंदी घातलीय.
  6. 2007 पर्यंत केनियात पाच वर्षांखालील 20 टक्के मुलं मलेरियामुळं दगावत होती. 2007 च्या निवडणुकांदरम्यान विकिलिक्सनं केनिया सरकारमधील अब्जावधी डॉ़लरचा घोटाळा उघड केला. तेव्हा सत्ताधाऱ्यांना जबर धक्का बसला. त्यानंतर केनियाच्या घटनेत बदल झाले आणि सरकारच्या कारभारात लक्षणीय पारदर्शकता आली. 

"... could become as important a journalistic tool as the Freedom of Information Act. " असं टाईम मॅगझिननं विकिलिक्सचा गौरव करताना म्हटलंय.

wikileaks.JPGभारतात आपल्याला माहितीच्या अधिकाराखाली वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळू शकते. या अधिकाराखाली शासनाकडे किंवा एखाद्या संस्थेकडे असलेली माहितीच उपलब्ध होते.  माहिती अधिकाराचा वापर करणाऱ्या कार्यकर्त्यांवर होणाऱ्या प्राणघातक हल्ल्यांमध्ये वाढ झालीय. गेल्या वर्षी देशभरात माहितीच्या अधिकाराचा वापर करणाऱ्या आठ कार्यकर्त्यांची हत्या झाली. त्यापैकी चारजण महाराष्ट्रातील होते. विकिलिक्सला माहिती देणाऱ्यांची नावच उघड होत नसल्यानं तिथं असा काही प्रकार नाही. भारतात अशा कार्यकर्त्यांची नावं उघड होतातच,  शिवाय त्यांच्यावर प्राणघातक हल्ले करून बदलाही घेतला जातोय.

इंटरनेटला माहितीचं महाजाल म्हटलं जातं, या महाजालाची ताकद पुन्हा एकदा यानिमित्तानं अधोरेखित झालीय. आजच्या न्यू मीडियामध्ये विकिलिकसनं क्रांती घडवलीय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यासाठी विकिलिक्स आणि ज्युलियन असांजला आंतरराष्ट्रीय स्तरावर वेळोवेळी गौरवण्यात आलंय. 2008 सालचं इकॉनॉमिस्ट मॅगझिन न्यू मीडिया अॅवॉर्ड विकिलिक्सला मिळालंय. इंग्लंडमधील अॅम्नेस्टी इंटरनॅशनलचं 2009 सालचं न्यू मीडिया एवॉर्ड विकिलिक्स आणि ज्युलियन असांजला मिळालंय.

2006 मध्ये चीनमधील दडपशाहीला कंटाळलेल्या काही तरुणांनी जगभरातील कार्यकर्त्यांच्या मदतीनं विकिलिक्स सुरु केली. यामध्ये पत्रकार, गणिती, माहितीसाठी झगडणारे कार्यकर्ते आणि अर्थातच मोठ्या प्रमाणावर संगणक तंत्रज्ञ होते. आज या चळवळीचं स्वरुप कल्पनेपेक्षा कितीतरी पट वेगानं वाढताना दिसतंय. अर्थात हे सगळं वाचताना बरं वाटत असलं तरी यामागं प्रचंड मेहनत आहे. सरकारी बंधनांना झुगारुन, कायद्याची लढाई लढत जगभरातील कार्यकर्ते अतिशय खडतर परिस्थितीत ही चळवळ वाढवताहेत.


प्रतिक्रिया
असे होऊ शकते का भरतामध्ये ,महाराष्ट्र मध्ये १) आय्पिल घोटाला ,२) सत्यम घोटाला,३)किलारी घोटाला,४)............................... कोण आहेत .... ते ,........................धन्यवाद्
प्रेषक -SANTOSH,दिनांक - 7/30/2010 12:00:00 AM
सर! फारच उपयुक्त माहिती दिली आहे. अशाच उत्तम लेखांची पुढील काळात आम्ही अपेक्षा करत आहोत...
प्रेषक -अजित ,दिनांक - 7/29/2010 12:00:00 AM
i like your information thanks
प्रेषक -mahesh ahire,दिनांक - 7/29/2010 12:00:00 AM
छान माहिती मिळाली, सॅल्यूट्स फोर विकलीक्स आणि सचिन धवन
प्रेषक -dnyaneshwar kudpe, sangali,दिनांक - 7/29/2010 12:00:00 AM
wah...wikliks. pravahavirodhat chalane sope nasate. pan tumhi chaltay.and sachinji khup chan shabanchi gumfan shreya sakahare(apala maharashtra, weekly)
प्रेषक -shreya sakhare,दिनांक - 7/29/2010 12:00:00 AM
Aapala ha lekh khup chhaan aahe. yatil mahiti aani tyatil susutrata vakhananyajogi aahe. khup sundar paddhatine sadarikaran kele aahe. regards, Nikhil Texas, US
प्रेषक -Nikhil,दिनांक - 7/28/2010 12:00:00 AM
खुप छान माहीती आहे... धन्यवाद सचिन,मेघपी...
प्रेषक -संदीप,दिनांक - 7/27/2010 12:00:00 AM
Prev Next

तुमची प्रतिक्रिया नाव ई-मेल तुमचा संदेश      
तक्रार निवारण होम पेज  |  आम्ही कोण?  |  दोन्ही बाजूंनी संवाद  |  माझा जॉब करायचाय?  |  जाहिरात