follow us at facebooktwitteryoutube
अपडेट: 08.00 am
  • राष्ट्रकुलच्या बॅटन रिलेचं आज पुण्यात आगमन  |  गणरायाच्या आगमनाच्या पाश्वभूमीवर पोलिसांचं संपूर्ण साताऱ्यात जिल्हाभर संचलन  |  मंगलोर विमान अपघातात धक्कादायक खुलासा, मुख्य पायलट दीड तास झोपल्याचं उघड  |  मी ज्योतिषी नाही, महागाईवर पंतप्रधान मनमोहनसिंह यांचं वक्तव्य  |  बेस्ट दरवाढीला मनपा सभेत मंजुरी, मध्यरात्रीपासून बेस्टची दरवाढ लागू  |  राम जन्मभूमी-बाबरी मशीद वाद; अलाहाबाद हायकोर्टाकडून 24 सप्टेंबरला निर्णयाची शक्यता  |  दादर टर्मिनस हाणामारीप्रकरणी नारायण राणे, संजय राऊत यांच्यासह 250 जणांवर गुन्हे  |  उदगीरमध्ये शिजला जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाचा कट  |  पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी दोघे ताब्यात, 8 महिन्यांनंतर ATSला मोठं यश  |  अभिनेता शायनी अहुजावरील बलात्काराचे आरोप खोटे?-मोलकरणीचं घुमजाव  |  
होम पेज
स्टार माझा
आम्ही कोण?
दिवसभरात
जॉब करायचाय?
कधी काय?
दोन्ही बाजूंनी संवाद
जाहिरात
माझा ब्लॉग
स्टोरीज ऑफ द डे
सहभागी व्हा
व्हिडिओ बघा
लोकप्रिय व्हिडीओ

दिवस माझा

वेळ ८.४०
खेळ माझा
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला मेल करा
Note प्रायव्हसी पॉलिसी
 
 
 
माझा ब्लॉग


विकिलिक्स, अफगाण वॉर डायरी आणि भारत
सचिन ढवण

विकिलिक्सनं अफगाण वॉर डायरी सर्वांसाठी खुली केली,आणि जगभरात खळबळ माजली. अमेरिकन प्रशासनाला पळता भुई थोडी झालीय. अमेरिका आता नवनवे दावे करुन प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करतेय. पण गेली अनेक वर्षे अफगाणिस्तानातील  भारतीयांवर जे हल्ले होत आहेत, त्यामागं पाकिस्तान असल्याचं आता पुराव्यानिशी सिद्ध झालंय. अमेरिका पाकिस्तानला दरवर्षी लाखो डॉलरची मदत करते. तो पैसा आयएसआयमार्फत तालिबान्यांकडे जातो आणि बळी पडतात ते भारतीय.

अफगाणिस्तान आणि भारताचे संबंध अनेक शतकांपासूनचे आहेत. पाकिस्तान निर्माण होण्याच्या आधीपासून हे संबंध आहेत. पाकिस्तानच्या निर्मितीनंतरही त्यात फरक पडलेला नाही. आजही अनेक भारतीय  अफगाणिस्तानात वेगवेगळ्या प्रकारची कामं करतच आहेत. भारतीय सेना तर अफगाणिस्तानात रस्ते बनवण्यासारखी महत्त्वाची कामं करतेय. म्हणूनच भारतीय कॉन्ट्रॅक्टर्सवर हल्ले करण्यासाठी आयएसआयनं तालिबानी अतिरेक्यांना सुमारे 7 ते 15 कोटी रुपये दिले.

wikileaks.JPGविकिलिक्सनं उघड केलेल्या गोपनीय रिपोर्टमधील  बरेचसे रिपोर्ट हे 2004 ते 2007च्या दरम्यानचे आहेत. तेव्हा जनरल परवेझ अश्फाक कयानी आयएसआयचे प्रमुख होते. अमेरिकने कयानी यांचं नेहमीच कौतुक केलंय कारण अमेरिकेच्या मते कयानी यांनी अतिरेक्यांशी संबंध असलेल्या मिलिटरी ऑफिसर्सना घरचा रस्ता दाखवलाय.

18 ऑक्टोबर 2007 मध्ये अमेरिकेच्या गुप्तचर विभागानं एक रिपोर्ट सादर केला. त्यात स्पष्टपणे असं म्हटलं होतं , आयएसआयनं सरकादीप या एजंटला अफगाणींशी संबंध प्रस्थापित करण्याचे आदेश दिलेत. जेणेकरुन  जलालाबाद, काबूल, हेरात, कंदहार आणि मझर-ए-शरीफ इथल्या इंडियन कॉन्सुलेटवर हल्ले करणं शक्य होईल. यावेळी कयानी आयएसआयचे प्रमुख होते. त्यानंतर 2008 मध्येही अशा अनेक सूचना आयएसआयनं दिल्याचं उघड झालंय. अर्थातच त्यासाठी कोट्यवधी रुपयांची आर्थिक तरतूद आयएसआयनं केली होती. john-obama 2807.jpg

विकिलिक्सनं ही गोपनीय माहिती उघड केल्यावर ज्येष्ठ अमेरिकी सिनेटर जॉन केरी यांनी हा मुद्दा इस्लामाबादपर्यंत नेण्याचं आश्वासन दिलंय.  असं आश्वासन देणं हासुद्धा अमेरिकेचा फार्सच आहे. कारण आयएसआयमधील अधिकाऱ्यांवर अतिरेक्यांशी संबंध असल्याचे आरोप होणं यात काहीच नवीन नसल्याचं केरी य़ांचं म्हणणं आहे. या आरोपांशी आम्ही आजही सामना करत आहोत, त्यात आम्हाला यशही येतंय असं केरी यांनी म्हटलंय. जॉन केरी हे अमेरिकन सिनेटच्या फॉरेन रिलेशन कमिटीचे चेअरमन आहेत. केरी हे बराक ओबामा यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

या सर्व घटनाक्रमात अमेरिकेचा दुटप्पीपणा एवढा की आयएसआय, तालिबान यांचे परस्परसंबंध माहित असूनसुद्धा अमेरिकेकडून पाकिस्तानला मिळणारी आर्थिक मदत कमी न होता ती वाढतेच आहे.  अमेरिकेकडून मिळणारी लष्करी मदतसुदधा दिवसेंदिवस वाढतेय.  कारण सरळ आहे, अमेरिकेला ही परिस्थिती अशीच चिघळत ठेवायची आहे.  आता भारतीय मुत्सद्दी यावर काय भूमिका घेतात हेच बघायचं.


प्रतिक्रिया
aamche bhatiya pudhari phakta paise khnyatach mutsadi ahet tyasathi te common wealth khelavanyat gark hotil kinwa slum development (Not Slum people development) yatach deshach (fakata swatach) hit sodhatil kinwa aplya high commandana khus karnyat dang hotil.
प्रेषक -sandesh more,दिनांक - 8/3/2010 12:00:00 AM
chan lihaley. aanakhi ashich mahti det rha.
प्रेषक -gajanan changdev surve,दिनांक - 7/29/2010 12:00:00 AM
chan lihaley. aanakhi ashich mahti det rha.
प्रेषक -gajanan changdev surve,दिनांक - 7/29/2010 12:00:00 AM
Prev Next

तुमची प्रतिक्रिया नाव ई-मेल तुमचा संदेश      
तक्रार निवारण होम पेज  |  आम्ही कोण?  |  दोन्ही बाजूंनी संवाद  |  माझा जॉब करायचाय?  |  जाहिरात