उल्हासनगरात जल्लोष
उल्हासनगरच्या यशस्विनी महासंस्थाने रेल्वेस्टेशनवर महिला प्रवाशांना गुलाब पुष्प वाटून आपला आनंद व्यक्त केला . उल्हासनगरच्या यशस्विनी महासंस्थाने ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयक अखेर राज्यसभेत मंजूर झाल्याबद्दल आज रेल्वेस्टेशनवर महिला प्रवाशाना व महिला व्यावसायिकांना गुलाब पुष्प वाटून आपला आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमात यशस्विनी महासंस्थाच्या ४५० ते ५०० सभासदांनी भाग घेतला होता.