follow us at facebooktwitteryoutube
अपडेट: 07.00 pm
  • फेसबुकच्या माध्यमातून 12 ऑक्टोबरला पुन्हा मीटर जाम  |  मुंबईत तीनशे ठिकाणी गणेश विसर्जनाची सुविधा, मनपाची माहिती  |  म्हाडा बांधणार अल्प, अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३१ हजार घरं  |  मध्यप्रदेश-देवासजवळ बस नदीत वाहून गेली, ५० जण बुडाल्याची भीती  |  ब्रिटनमध्येच शरण घेण्याची पाक क्रिकेटर मो. आसिफची इच्छा, द टेलिग्राफचं वृत्त  |  राष्ट्रकुलच्या बॅटन रिलेचं आज पुण्यात आगमन  |  गणरायाच्या आगमनाच्या पाश्वभूमीवर पोलिसांचं संपूर्ण साताऱ्यात जिल्हाभर संचलन  |  मंगलोर विमान अपघातात धक्कादायक खुलासा, मुख्य पायलट दीड तास झोपल्याचं उघड  |  
होम पेज
स्टार माझा
आम्ही कोण?
दिवसभरात
जॉब करायचाय?
कधी काय?
दोन्ही बाजूंनी संवाद
जाहिरात
माझा ब्लॉग
स्टोरीज ऑफ द डे
सहभागी व्हा
व्हिडिओ बघा
लोकप्रिय व्हिडीओ

महाराष्ट्र देशा

वेळ ८.००
8 PM विशेष
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला मेल करा
Note प्रायव्हसी पॉलिसी
 
 
 
स्टोरीज ऑफ द डे


किर्लोस्कर समूहाची शतकपूर्ती

महाराष्ट्राला उद्योजकता शिकविली ती किर्लोस्कर उद्योगसमूहाने! शंभर वर्षांपूर्वी लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी अक्षरश: उजाड माळरानावर या उद्योजकतेचे बीज पेरले आणि अवघ्या महाराष्ट्राला समृद्धीचा राजमार्ग दाखवून दिला..आज सांगलीजवळ किर्लोस्करवाडीत हा शतकोत्सव साजरा करण्यात आला.
आजपासून बरोबर १०० वर्षांपूर्वी किर्लोस्करवाडीच्या याच माळरानावर एका मराठी उद्योजकानं एक स्वप्न पाहिलं आणि आज हे तिथे किर्लोस्करांचं साम्राज्य उभं आहे... लक्ष्मणराव किर्लोस्कारांनी सुरू केलेल्या किर्लोस्कर उद्योगसमूहाच्या स्थापनेस आज, १० मार्च २०१० रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली.... एका मराठी माणसानं सुरू केलेल्या उद्योगाची शतकोत्सवी गाथा पताका आज जगभरात फ़डकते आहे....
१०० वर्षांपूर्वी काही गावक-यांना घेऊन सुरु केलेला हा उद्योग आज आज थेट ८ ते १० हजार जणांना रोजगार व एक लाखावर कुटुंबीयांचा आधार बनला आहे. आजच्या  शतकोत्सव साजरा झाला...संपूर्ण किर्लोस्कर कुटुंब इथे हजर होते
गेल्या शंभर वर्षात किर्लोसकर उद्योगसमुळे अनेकांच्या जीवनमानात अमुलाग्र बदल घडून आले, संपूर्ण पणे शेतीवर अवलंबून असणारा या भागाताला माणूस यंत्रयुगाशी समरस झाला. आज या भागातले अनेक तरूण पदेशात जाऊन भारताचं नावं उंच करत आहेत.या उद्योगाशी समरस झालेली अनेक कामगारांची कुटुंबही आवर्जून हजर होती..
महाराष्ट्रचं नावं आज देशातलं पहिल्या क्रमांकचं औद्योगिक राज्य म्हणून घेतलं जात. पण याची मूहूर्तमेढ रोवली ती किर्लोसरकरांनी आणि त्यांच्या महत्वाकांक्षी योजनांनी.. त्यामुळे अशा उद्योगाला १०० वर्ष पूर्ण होणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीने खरोखरचं भूषणावह म्हणावं लागेल

टीपण्णी
1

नाव  
ई मेल    
तुमची प्रतिक्रिया  

varun
   
तक्रार निवारण होम पेज  |  आम्ही कोण?  |  दोन्ही बाजूंनी संवाद  |  माझा जॉब करायचाय?  |  जाहिरात