पुण्यात सेनापती बापट रोडवरील मुथा चेंबर्समध्ये भीषण आग
पुण्यातील सेनापती बापट रोडवरील मुथा चेंबर्समध्ये भीषण आग लागली आहे. पाचव्या मजल्याला लागलेली आग आता सहाव्या आणि सातव्या मजल्यापर्यंत गेली आहे. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. त्याचबरोबर मोठ्या क्रेनच्या सहाय्यानंही आग विझवण्याचं काम सुरू आहे. नव्याने तयार झालेल्या या इमारतीमध्ये फायबर आणि प्लास्टिकचाच जास्त वापर केलाय. नेमक्या याच कारणामुळे ही आग पसरू लागली आहे. या इमारतीमधील कर्मचारी आणि लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचं काम सुरू आहे. सर्वप्रथम ही आग आटोक्यात आणण्याचं मोठं आव्हान अग्निशमनदलापुढे आहे.
|