follow us at facebooktwitteryoutube
अपडेट: 08.00 am
  • राष्ट्रकुलच्या बॅटन रिलेचं आज पुण्यात आगमन  |  गणरायाच्या आगमनाच्या पाश्वभूमीवर पोलिसांचं संपूर्ण साताऱ्यात जिल्हाभर संचलन  |  मंगलोर विमान अपघातात धक्कादायक खुलासा, मुख्य पायलट दीड तास झोपल्याचं उघड  |  मी ज्योतिषी नाही, महागाईवर पंतप्रधान मनमोहनसिंह यांचं वक्तव्य  |  बेस्ट दरवाढीला मनपा सभेत मंजुरी, मध्यरात्रीपासून बेस्टची दरवाढ लागू  |  राम जन्मभूमी-बाबरी मशीद वाद; अलाहाबाद हायकोर्टाकडून 24 सप्टेंबरला निर्णयाची शक्यता  |  दादर टर्मिनस हाणामारीप्रकरणी नारायण राणे, संजय राऊत यांच्यासह 250 जणांवर गुन्हे  |  उदगीरमध्ये शिजला जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाचा कट  |  पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी दोघे ताब्यात, 8 महिन्यांनंतर ATSला मोठं यश  |  अभिनेता शायनी अहुजावरील बलात्काराचे आरोप खोटे?-मोलकरणीचं घुमजाव  |  
होम पेज
स्टार माझा
आम्ही कोण?
दिवसभरात
जॉब करायचाय?
कधी काय?
दोन्ही बाजूंनी संवाद
जाहिरात
माझा ब्लॉग
स्टोरीज ऑफ द डे
सहभागी व्हा
व्हिडिओ बघा
लोकप्रिय व्हिडीओ

नमस्कार महाराष्ट्र

वेळ ८.२०
दिवस माझा
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला मेल करा
Note प्रायव्हसी पॉलिसी
 
 
 
स्टोरीज ऑफ द डे


पुणे दिनांक २९/०७

पुण्यात पवारांच्या जागेत 'एमसीए'चं ऑफिस
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा कारभार शरद पवारांच्या मालकीच्या जागेतून चालतोय.आणि याचा एमसीएच्या पदाधिका-यांना पाच वर्षानंतरही सुध्दा गंध लागलेला नाही.

या जागेच्या भाड्यापोटी पवारांना दरमहा दोन लाख रुपये मिळताहेत आणि 25 लाख रुपये अनामत म्हणुन मिळालेत.

ऑफिसच्या जागेसाठी आलेल्या 14 प्रस्तावापैकी फक्त पवारंच्या जागेला ग्रीनसिग्नल मिळालाय तोही शरद पवार बीसीसीआयचे अध्यक्ष असताना. म्हणजे पदावर असताना ललित मोदीप्रमाणचं पवारांनीही पदाचा गैरवापर केलाय.शिवाय पवारांच्या गनिमी राजकारणाचं हे आणखी एक उदाहारण असल्याची चर्चा आहे.

                                         **********

मुथा चेंबर्सच्या पाचव्या मजल्याला आग
पुण्याच्या सेनापती बापट रोडवर भीषण आग लागलीय. मुथा चेंबर्सच्या पाचव्या मजल्यावर लागलेली ही आग सातव्या मजल्यापर्यंत पोहचतेय. फायबर आणि प्लास्टिकपासून ही संपूर्ण इमारत बनल्यानं आग वेगानं पसरतेय.

 या इमारतीतल्या सर्वांना बाहेर काढण्यात आलं असून आग विझवण्यासाठी अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झालंय.

 क्रेनच्या मदतीनं आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या इमारतीच्या जवळ अनेक आयटी आणि कॉर्पोरेट ऑफिसेस असल्यानं परिसरात घबराट पसरलीय.

                                          ********

खडकवासला धरण शंभर टक्के भरलं
पुण्याला पाणी पुरवठा करणारा खडकवासाला धरण १०० टक्के भरले असून यातून आता दोन हजार विसर्ग सुरू केला आहे.खडकवासला धरणातून सायंकाळी पाचवाजल्यापासून दोन हजार क्युसेस विसर्ग सुरु केला आहे.

पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या वरसगांव आणि पानशेत धरणातही पाणीसाठा वाढत आहे.
काही दिवसापासून पुण्यात चांगलाच पाऊस असल्यानं पाणीसाठा वाढत आहे.

सध्या पानशेत धरण ४० टक्के भरले आहे, तर वरसगांव धरण ३० टक्के भरले आहे.
पुण्यात पुढील काही दिवस कायम पाऊस राहीला तर पुण्यातीस पाणी कपातीचा प्रश्न पूर्णपणे संपेल.

                                       ********

मीरा बोरवणकरांनी पदभार स्वीकारला
पुण्याच्या पोलिस आयुक्त म्हणून मीरा बोरवणकर यांनी डॊ.सत्यपाल सिंग यांच्याकडून आज पदभार स्वीकारला. त्या पुण्याला मिळालेल्या पहिल्या महिला पोलिस आयुक्त आहेत.

१९९८१ बॅचच्या आयपीएस अधिकारी असलेल्या बोरवणकर यांच्याकडे सध्या सीआयडीच्या विशेष संचालक म्हणून जबाबदारी होती.
 
या अगोदर त्या मुंबईच्या गुन्हे विभागाच्या अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून काम करणाऱ्या पहिल्या महिला पोलिस अधिकारीही होत्या.
 
पुण्यात महिला सुरक्षेला जास्त प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी पदभार स्वीकारतांना सांगितलं.
सत्यपाल सिहांच्या बदलीनंतर काय?
अखेर पुण्याच्या सत्यपाल सिंहांची बदली झालीच.मंत्र्यांशी वाकड्यात शिरलं की काय परिणाम होतो हे सत्यपाल सिंहांना जेवढा अनुभव आला तेवढा क्वचितच एखाद्या अधिकाऱ्याला आला असेल. पुण्यातली त्यांची कारकीर्द ही खऱ्या अर्थाने वादळी ठरली.
 
नव्या पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर पुणेकरांना विश्वास देऊ शकतील ? ते सुरक्षित आहेत? नुकतीच हायकोर्टाने पुणे पोलिसांच्या तपासावर ताशेरे ओढल्यानंतर पुणे पोलिसांनी असा दावा केला होता त्यांची तपासयंत्रणा मुंबई पोलिसांपेक्षाही सरस आहे.पण ह्या दाव्यात कितपत तथ्य आहे.अजूनही अनेक महत्वाच्या केसेसमध्ये पुणे पोलिसांना यश आलेलं नाही.

                                          ***********
 पीएमपीएमएल बसच्या भाड्यात वाढ
रिक्षांपाठोपाठ आता सामान्य पुणेकरांचा खिसा कापण्यासाठी पीएमपीएमएल बसच्या भाड्यात वाढ आज जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या एक ऑगस्टपासून बसच्या तिकिटासाठी पुणेकरांना दोन रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.

इंधन दरवाढीचे कारण पुढे करुन पीएमपीएमएलने ही दरवाढ केली आहे. बसच्या पहिल्या टप्प्यासाठी आता पाच रुपये मोजावे लागणार आहेत.

 दरवाढीबद्दल एकच दिलासादायक गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांच्या व ज्येष्ठ नागरिकांच्या बसपासमध्ये मात्र कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही.

दरवाढ झाली असली तरी पीएमपीएमएलद्वारे दिल्या जाणाऱया सुविधांमध्ये सुधारणा होणार का हा प्रश्न अजून अनुत्तरितच आहे.

 सध्या पीएमपीएमएलमधून प्रवास करणाऱयांची संख्या किमान दहा लाख आहे. मात्र त्यांना मिळणाऱया सुविधांचा दर्जा अत्यंत सुमार आहे.

दिवसाकाठी रोज पुण्याच्या रस्त्यावरं किमान पाच- सहा बसेस बंद पडलेल्या दिसतात.

बसच्या फेऱयांची संख्या कमी असल्यामुळे नागरिकांना अक्षरशः जीवावर उदार होऊन बसच्य दारात लटकत प्रवास करावा लागतो.

 मात्र, विशेष म्हणजे ही स्थिती डिसेंबरनंतर बदलली जाईल असा विश्वास प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष दिलीप बंड यांनी व्यक्त केली. 

                                         ***********

रोझरी स्कूलची फी वाढ रोखण्यात पालकांना यश
रोझरी स्कूलच्या फी वाढी विरोधात पालकांनी चालवलेल्या आंदोलनाला अखेर दीड महिन्यानंतर यश आल.

ही फी वाढ मागे घेतली ज़ात नसल्याबद्दल या पालकांपैकी पाच पालकांनी मागील तीन दिवसांपासून मध्यवर्ती प्रशासकीय इमारती बाहेर बेमुदत उपोषनाला सुरुवात केली होती.

आज तिसऱ्या दिवशी हे आंदोलन चिघळत चालल होत.या आंदोलकांना शिवसेना, भाजप,  मनसेच्या कार्यकर्त्यांचाही पाठिंबा मिळाला.

 पाठिंब्यामुळे शिक्षण संचालकाना रोझरीच प्रशासन, पालकांचे प्रतिनिधी आणि राजकीय प्रतिनिधि यांच्या सोबत बैठक घ्यावी लागली आणि वाढत चाललेल्या या दबावापुढे अखेर फी वाढ मागे घ्यावी लागली.

 फी वाढ मागे घेताच पालकांनी एकच जल्लोष केला. रोझरीच्या पालकांनी फी वाढी विरोधात दिलेल्या या यशस्वी लढ्याचे दूरगामी परिणाम पुण्याच्या शिक्षण क्षेत्रावर होणार आहेत.


टीपण्णी
Mala hi web sit khup changali vatali. Ani vishesh manje yaat marathi bhasha ahe. Mala abhiman ahe "starmajha" var. @ Prasad Dnyaneshwar Shirsikar. (my Mob. No. 9028342399)
Prasad shirsikar
1

नाव  
ई मेल    
तुमची प्रतिक्रिया  

varun
   
तक्रार निवारण होम पेज  |  आम्ही कोण?  |  दोन्ही बाजूंनी संवाद  |  माझा जॉब करायचाय?  |  जाहिरात