सांगली स्मशानभूमीत प्रेतांनाही मिळेना मोक्ष
सांगली शहरातील भरवस्तीत असलेल्या स्मशानभूमीत दिवसाढवळ्या प्रेतांची विटंबना चाललीय. अर्धवट जळलेल्या प्रेतांवर कुत्र्यांनी डल्ला मारण्याचे प्रकार सर्रास घडताहेत. कुत्र्यांनी चितेवरून प्रेताला ओढून खाण्याचे प्रकार दिवसेंदिवस घडत आहेत.
या सगळ्या प्रकारांकडे मनपाचं मात्र अक्षम्य दुर्लक्ष होत असल्यानं लोकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
|