विजय दाभाडे आणि राठोडच्या नार्कोटेस्टला परवानगी
पुण्याचे समाजसेवक सतीश शेट्टी हत्या प्रकरणात वडगाव-मावळ न्यायालयाने आज महत्वपूर्ण निकाल दिलाय. सतीश शेट्टी हत्याप्रकरणात अटकेत असलेल्या विजय दाभाडे आणि डोंगऱ्या राठोडच्या ब्रेन मॅपिंग, लाय डिटेक्टर आणि नार्को टेस्टला वडगाव मावळ कोर्टानं परवानगी दिलीय.
दरम्यान, विजय दाभाडे आणि डोंगऱ्या राठोडच्या ब्रेन मॅपिंग, लाय डिटेक्टर आणि नार्को टेस्टमुळे सतीश शेट्टी हत्या प्रकरणाच्या तपासासाठी महत्वपूर्ण माहिती हाती लागू शकते असा पुणे पोलिसांना विश्वास वाटतोय.
|