पुण्यात व्हीआयआयटीत रोबो ट्रिक्स स्पर्धा
पुण्यातील विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे व्हीआयआयटी या संस्थेनं रोबो ट्रिक्स या स्पर्धेचं आयोजन केलंय. 9 फेब्रुवारीपर्यंत असणा-या या स्पर्धेत राज्यातील विविध इंजिनीअरिंग कॉलेजच्या पंधराशे टीम्सनं भाग घेतलाय. सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी इथे वेगवेगळे रोबो साकारलेत. विद्यार्थ्यांनी तयार केलेले रोबोट आणि संशोधनं पाहायला जणू इथे जत्राच फुललीय.
विद्यार्थ्यांच्या क्रिएटिव्हिटीला चालना मिळावी, यासाठी ही स्पर्धा घेण्यात आलीय. इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहून काही नावाजलेल्या कंपन्यांनी मदतीचा हात पुढे केलाय. यातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक संधीही मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
|