व्हॅलेंटाईन डेला प्रेमाची हवाई सफर
प्रेमासाठी वाट्टेल ते म्हणणा-या लव्ह बर्डस् ना आता खरोखरच आकाशात उंच भरारी घेऊन आपलं प्रेम व्यक्त करता येणार आहे. मुंबईमध्ये तुम्ही हजारो फूट उंचावर जाऊन व्हॅलेंटाईन डे साजरा करु शकता. काही खाजगी विमान कंपन्या अशा प्रकारची पॅकेजस देत आहेत. मात्र या प्रेमाची किंमत जरा जास्त आहे. ४५ हजार रुपयांमध्ये तुम्हाला ही प्रेमाची एक हवाई सफर पडणार आहे. फोर सिटर हेलिकॉप्टरमध्ये ३० मिनिटांचा एक राऊंड असणार आहे. या खास लव्ह इन द एअरचे दोन टेक ऑफ पॉइंटस् असणार आहेत. जुहू चौपाटीवरून उड्डाण झाल्यावर बोईसरपर्यंतची सफर करता येईल. तसेच महालक्ष्मी रेसकोर्सवरून निघल्यावर हेलिकॉप्टरने तुम्ही कुलाबा ते अलिबागची सफर करता येईल. मुंबईमध्ये अशा प्रकारच्या १४ जोडप्यांनी आपल्या हवाई व्हॅलेंटाईन डेचं बुकींग केलं आहे.
मागच्या महिन्यापासून ही सफर सुरू करण्यात आली आहे. त्यावेळी सफरीची किंमत ३५ हजार रुपये होती मात्र या महिन्यांत ती दहा हजार रुपयांनी वाढून ४५ हजार रुपयांपर्यंत गेली आहे.
|