|
|
|
 |
दिवसभरातील
टॉप स्टोरी |
 |
|
स्मिता ठाकरेंकडून सोनिया गांधींचं कौतुक
|
स्मिता ठाकरेंनी सोनिया गांधींचं मुक्तकंठानं कौतुक केलं आहे. भारताच्या स्वातंत्र्यात महात्मा गांधींचं महत्त्वपूर्ण योगदान होतं. त्याच प्रमाणे आता महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यामुळे एकप्रकारे सोनिया गांधींनी मोठं आरक्षण मिळवून दिलं आहे, अशा शब्दात स्मिता ठाकरेंनी सोनिया गांधींवर स्तुतिसुमनं उधळली आहेत.
एकेकाळी मातोश्रीवर स्मिता ठाकरेंचा दबदबा होता. युती सरकारच्या काळात मोठमोठे अधिकारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भेटण्यापूर्वी स्मिता ठाकरेंची भेट घेत असत. मात्र, शिवसेनेची सत्ता गेली तसं स्मिता ठाकरेंचा दबदबाही कमी झाला. याच दरम्यान, उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची सूत्र हाती घेतली आणि त्यानंतर स्मिता ठाकरे एकदम बाजूलाच पडल्या. आता त्यांचे काँग्रेसमध्ये जाण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
|
|
|
|
|
|