अंबाजोगाई ही आद्यकवी मुकुंदराज यांची कर्मभूमी. अंबाजोगाईतच मुकुंदराजांनी मराठी कवितेचा पहिला ग्रंथ विवेक सिंधूची रचना केली. गेल्या साडे आठशे वर्षात मराठी कवितेचे रूपांतर एका महानदीसारखे विशाल झाले आहे आणि त्यामुळे मुकुंदराजांच्या गावात मराठी कवितांचे ग्रंथालय उभे करण्यासाठी अंबाजोगाईची मसाप आणि पत्रकार संघ सरसावलाय. कविता संग्रहालयासाठी लोकांनी त्यांच्याकडचे कविता संग्रह भेट द्यावेत असं आवाहन मसापसह स्टार माझाही आपल्यालं करतय. कवितासंग्रह मराठीच असावा मग तो जुन्या कवीचा असो की नव कवीचा. कविता संग्रह पाठवण्यासाठी पत्ताअमर हबीबपरिसर प्रकाशन,अंबर हाऊसिंग सोसायटी,अंबाजोगाई.जि.बीडपुस्तक पोस्टाने पाठवणे शक्य नसेल तर अमर हबीब यांच्याशी ०९४२२९३१९८६ या नंबरवर फोन करावा किंवा PARISAR.PRAKASHAN @GMAIL.COM वरमेल करावा. कवितासंग्रह नेण्याची व्यवस्था केली जाईल.