महापालिकेत पदोन्नती, बदल्यांवरून खडाजंगी
नाशिक महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांच्या पदोन्नती आणि बदल्यांच्या विषयावरुन आज झालेल्या स्थायीच्या बैठकीत आयुक्त बी. डी. सानप आणि इतर सदस्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या प्रतिभा पवार आणि सभापती संजय साबळे यांच्या सुचनांना केराची टोपली तर दाखवलीच. शिवाय प्रत्येक गोष्टीसाठी विशेष महासभा घेण्याचा अट्टाहास स्थायीच्या सदस्यांनी करु नये.
आयुक्तांच्या अधिकारात अडथळा आणणारे बेकायदेशीर ठराव आणले जात असतील तर आपल्याला काम करण्यात रस नसल्याचं ठणकावून सांगत आयुक्तांनी रुद्रावतार धारण केलं.
आयुक्तांनी व्यक्त केलेला संताप आज महापालीका वर्तुळात चर्चेचा विषय ठरला होता.शिवसेनेच्या नगरसेवकांनीही या प्रकरणावरुन गेल्या आठवड्यात आयुक्तांवर आर्थिक भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तीच रि स्थायीच्या बैठकीतही ओढण्याचा प्रय़त्न होत असल्याचं दिसल्यानं आयुक्तांचा पारा चढला होता.
********************************************
ग्रामीण कर्ज मेळाव्याला भरघोस प्रतिसाद
आगामी काळात बँकींग व्यवसायात वाढ करायची असेल तर आता इंडीया कडून भारताकडे जायलाच हवं ही बाब बड्या बँकांनी लक्षात घेतलीय. आणि त्यामुळेच खास ग्रामीण भागातल्या ग्राहकांसाठी, शेतकऱ्यांसाठी विविध योजना आखायला सुरूवात केलीय.
अतिशय मोठ्या संख्येनं असलेले हे ग्राहक आपल्याकडे ओढण्यासाठी बड्या बँकांनी कसून प्रयत्न करायला सुरूवात केलीय. नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगांवला आज खास शेतकऱ्यांसाठी HDFC बँकेनं कर्ज मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
एक कोटी साठ लाख रूपयांच्या रकमेचं कर्ज आजच्या एका दिवसांत वाटण्यात आलं. ग्रामिण भागात लक्ष केंद्रीत केल्यानं व्यवसायात शंभर टक्क्यांनी तरी वाढ होईल असा विश्वास HDFC चे आदित्य पुरी व्यक्त करतात.
शेतकरीही या कर्जमेळ्यानं आनंदित आहेत. कमी व्याज दरानं कर्ज मिळाल्याचा आनंद त्यांना सुखावतोय. त्यामुळेच घेतलेल्या गाडीतून घराचा किराणा आणण्यापासून मालवाहतूक करण्याचा इरादा ते व्यक्त करतात.
पिंपळगावला झालेल्या या कर्जमेळाव्यात अगदी वाहनापासून ते किसान क्रेडीट कार्ड आणि ग्रामिण हौसिंग लोनलाही परवानगी शेतकऱ्यांना मिळालीय.
या मेळाव्याला मिळालेल्या प्रतिसादानं एचडीएफसीचे अधिकारीही खुश झाले असून भविष्यात ठिकठिकाणी असेच मेळावे घेण्याचा त्यांचा निश्चय आहे.
*********